HW News Marathi
महाराष्ट्र

जलसा, प्रतिक्षा, रामायण हे फिल्मसिटीचं वैभव, हे वैभव सुद्धा तिकडे घेऊन जाणार आहात का? राऊतांचा योगींना सवाल 

मुंबई | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले आहेत. मुंबईची फिल्म सिटी उत्तर प्रदेशात नेण्यासाठी आले असता सत्ताधारी पक्षाकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (२ डिसेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आदित्यनाथ यांच्यावर सडकून टीका केली आहे. देशात फिल्मसिटी काय फक्त मुंबईतच आहे का? तामिळनाडूतही फिल्मसिटी आहे. तिकडेही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जाणार आहेत का? की त्यांनी केवळ मुंबईशीच पंगा घेतलाय?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

योगी आदित्यनाथ हे साधू आहेत. महाराज आहेत. उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानिमित्ताने ते काही कलाकारांना भेटले. अक्षयकुमारलाही भेटले. अक्षयकुमार कदाचित त्यांना आंब्याच्या पेट्या घेऊन गेले असतील, अशी कोपरखळी लगावतानाच मुंबईतील फिल्मसिटी एका रात्रीत उभी राहिलेली नाही. अनेक वर्षाची मेहनत आणि कष्ट त्यामागे आहेत. योगी मुंबईत आले. तसे तामिळनाडूतही जाणार आहेत का? तिकडेही मोठी फिल्मसिटी आहे. की फक्त योगींनी मुंबईशीच पंगा घेतलाय?, असा सवाल राऊत यांनी केला.

तुम्ही फिल्मसिटी उभी करण्यासाठी भिंती उभ्या कराल. पानंफुलं लावाल. पण सुरक्षेचं काय? मुंबईसारखी सुरक्षा तुम्ही देऊ शकणार आहात का? फिल्म सिटीबरोबर मुंबईची व्यवस्थाही घेऊन जाणार आहात का? असा सवाल करतानाच शेवटी मुंबई ही मुंबई आहे. फिल्मसिटी उत्तर प्रदेशात घेऊन जाणं मस्करी वाटते काय? असा सवालही त्यांनी केला.जलसा, प्रतिक्षा आणि रामायण ही केवळ बंगल्यांची नावं नाहीत तर ते फिल्मसिटीचं वैभव आहे. हे वैभव सुद्धा तिकडे घेऊन जाणार आहात का? असा सवाल करतानाच काही वर्षांपूर्वी नोएडामध्ये फिल्मसिटी उभी राहिली होती. तिचं काय झालं ते आधी सांगा, असंही ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘लखोबा लोखंडे’चं लिखाण हे फडणवीसांचं मत होतं का?, रुपाली चाकणकरांचा सवाल!

News Desk

काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk

‘मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून नाचवले जात आहेत’, सेनेचा भाजपवर हल्ला बोल

News Desk