HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊतांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस, लसीवरुन राजकारण न करण्याचा दिला सल्ला

मुंबई | संपूर्ण देशभरात कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे रुग्ण वाढतायत तर दुसरीकडे लसीकरणही सुरु आहे. सामान्य नागरिकांसोबत नेत्यांनीही लस घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (१७ एप्रिलला) कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. डोस घेतल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रियाही दिली आहे. कोरोनाचा संसर्ग मोठा आहे. देशभर चिता जळत आहेत. त्यामुळे आता तरी शहाणे व्हा. त्या चितेत राजकारण जाळून टाका, असं आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना केलं आहे.

संजय राऊत यांनी आज मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना विरोधकांना हे आवाहन केलं. मी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. पहिला संसद भवन परिसरात घेतला होता. आता मुलुंडच्या फोर्टिसमध्ये घेतला. लस सुरक्षित आहे. सुरक्षित राहण्यासाठी सर्वांनी लस घ्या. महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालं पाहिजे, असं राऊत म्हणाले आहेत.

यावेळी त्यांनी लसीकरणावरून राजकारण करणाऱ्या विरोधकांनाही त्यांनी फटकारले. लसीकरणावर राजकारण करू नका. देशभरात कोरोनाग्रस्तांच्या चिता जळत आहेत. त्या बघा आणि शहाणे व्हा. त्या चितेत राजकारण जाळा, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत. त्यांना साथ द्या. कोरोनाची लाट मोठी आहे. सहकार्य करा. केवळ टीका करण्यात वेळ घालवू नका, असंही ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांविरोधात आरोपपत्र दाखल!

News Desk

पोकरा अंतर्गत मृद व जलसंधारणाच्या कामांना गती देण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

Aprna

अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा, नाहीतर कोकणात राहून आपल्या स्टाईलने पंचनामे करावे!

News Desk