HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांचा भाजपला इशारा!

मुंबई। प्रसाद लाड यांनी त्यांच्या एका भाषणात शिवसेना भवन तोडण्याचे वक्तव्य केलं आहे, अशी चर्चा सर्वत्र सुरु असताना. शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर प्रसाद लाड यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे. प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी आधी यावर भाष्य करणे टाळले होते, त्यांच्यामते या व्यक्तीच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. ते सगळं आमचे कार्यकर्ते पाहतील. परंतु त्यानंतर आज संजय राऊन यांनी त्यांचे मौन तोडले आणि प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

जणू आम्ही शिवसेना भवनच फोडायला जाणार

खरेतर जेव्हा प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन तोडण्याचे वक्तव्य केलं अशी चर्चा सुरु असताना, प्रसाद लाड यांनी त्यांचे यावर वक्तव्य केलं की, “माझं भाषणामध्ये असं म्हणणं होतं, की आम्ही माहिमला येतो तेव्हा इतका पोलीस बंदोबस्त ठेवला जातो की, जणू आम्ही शिवसेना भवनच फोडायला जाणार आहोत, पण या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे.”त्यानंतर संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधत आपलं वक्तव्य दिलं

भाजपा नेत्यांवर सडकून टीका

“ज्यांनी ज्यांनी शिवसेना भवनावर हल्ले करायचा प्रयत्न केला ते राजकारणातून आणि सार्वजनीक जीवनातून नंतर गायब झाले, हा आजवरचा इतिहास आहे.” शिवसेना भवन तोडण्याची भाषा केल्यामुळे संजय राऊतांनी भाजप नेत्यांवर सडकून टीका केली.

प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले?

नारायण राणे आणि राणे कुटुंबीयांना मानणारा देखील स्वाभिमानचा एक खूप मोठा गट आज राणे साहेबांच्या निमित्तानं, नितेशजीं निमित्तानं भारतीय जनता पार्टीमध्ये आलाय. त्यामुळं भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चितपणे डबल झाली आहे. त्यामुळे नितेशजी पुढच्या वेळेस कार्यकर्ते कमी आणुयात, कारण आपण आलो की पोलिसचं खूप येतात. फक्त त्यांना सांगुयात की ड्रेसमध्ये पाठवू नका म्हणजे त्यांना हॉलमध्ये बसता येईल. “एवढी तुमची आमची भीती तुमची आमची की ह्यांना असं वाटतं की हे माहिम मध्ये आले की सेनाभवन फोडणार आहेत.काय घाबरू नका वेळ आली तर ते देखील करुयात, असं प्रसाद लाड म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेट्रोल, डिझेल नाही तर आता ‘या’ तेलावर चालणार गाड्या, नितिन गडकरींचे संकेत

News Desk

महाराष्ट्राला ड्रायव्हर नको आहे सक्षम मुख्यमंत्री हवा आहे – नारायण राणे 

News Desk

पीएसआयच्या बंदुकीतून सुटली आणि दुस-या पीएसआयच्या पायात घुसली

News Desk