HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊत आज लीलावती रुग्णालयात दाखल होणार

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत आज (२ डिसेंबर) लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. २०१९ साली नोव्हेंबर महिन्यात त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली होती. पुन्हा एकदा उद्या (३ डिसेंबर) अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. डॉ मॅथ्यु, डॉ अजित मेनन यांच्या मार्गदर्शतेखाली ही शस्त्रक्रिया होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत शनिवारी लीलावती रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांची प्रथमिक तपासणी झाली. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांच्यावर हृदयाची अँजिओप्लास्टी सर्जरी झाली होती. याच सर्जरीशी निगडीत शनिवारी त्यांच्या पुढील तपासण्या करण्यात आल्या आहेत.

गेल्या वर्षी म्हणजेच २०१९ला नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूकीचे निकाल लागल्यानंतर संजय राऊत यांच्या छातीत वेदना होत असल्याने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संजय राऊतांवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस आढळून आले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वंचितांचा लढा लढणे, ज्यांचा कुणी वाली नाही त्यांची वाली होणे ही माझी भूमिका – पंकजा मुंडे

News Desk

“अच्छे दिन, स्वर्ग दूरच राहिला, पण नरक तो हाच काय?”, सेनेचा मोदी सरकारला सवाल

News Desk

#CoronaVirus : राज्यातील सरकारी कार्यालये ७ दिवसांसाठी राहणार बंद ?

swarit