HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवार शपथविधीला गेलेत हे आम्हांला माहित होते!, संजय राऊतांचा खुलासा

नाशिक | विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस आणि  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहाटेचा शपथविधीविषयी सर्वांनाच माहिती आहे. मात्र, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली होती. या दोघांचा शपथ विधी सोहळा हा महाविकासआघाडीमधील पक्षांना माहीत होते, असा खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच भाजपने सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ऑफर दिली होती. याबाबत मला माहिती होती, असेही राऊत यांनी सांगितले आहे.

शरद पवार यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त ‘लोकसत्ता’ वृत्तपत्राने आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात शरद पवारांची विशेष मुलाखत घेण्यात आली होती. त्यावेळी ते पहाटेच्या शपथविधीबाबत सविस्तरपणे बोलले. ‘मी अजित पवारांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलं असतं, तर पूर्ण सरकार बनवलं असतं, असं अर्धवट काम केलं नसतं.’ असं शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादीला भाजपकडून ऑफर

दरम्यान, यावर संजय राऊत यांनी नाशिकमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. राऊतांनी सांगितले, “शरद पवार सांगत आहेत, म्हणजे ते खरं असावं. भाजप सत्ता स्थापन करण्यासाठी उत्सुक होती. काहीही करुन त्यांना महाराष्ट्रात सरकार स्थापन करायचं होतं. त्यामुळे यांच्याशी बोला, त्यांच्याशी बोला. अजित पवारांना गाठा, असे त्यांचे उपक्रम सुरु होते,” अशी टीका राऊतांनी भाजपवर केली आहे. त्याचबरोबर शरद पवारांच्या पक्षाला भाजपकडून ऑफर आली होती, याची माहिती मला होती, असेही त्यांनी सांगितले.

 भाजपचं सरकार येऊ शकलं नाही

राऊत म्हणाले, त्या काळात आम्ही एकमेकांपासून काहीही लपवत नव्हतो. आमच्यात गुप्तता नव्हती. कोण कोणाशी बोलतो आहे, कोण कोणाला भेटायला जात आहे, हे आम्हांला माहीत होतं. आमच्यात अत्यंत पारदर्शकता होती. पण, हे भाजपला माहीत नव्हतं. त्या पारदर्शकतेमुळे त्यांचे सरकार येऊ शकले नाही. अजित पवार शपथ घ्यायला गेलेत हे देखील आम्हांला माहीत होते, असे संजय राऊत म्हणाले.

मोदी स्वत: मास्क लावत नाहीत

दरम्यान, यावेळी संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही हल्ला चढवला आहे. “मोदी सर्वांना मास्क लावा सांगतात पण, स्वत: मास्क लावत नाहीत. त्यामुळे आम्ही पंतप्रधानांचं ऐकतो आणि मास्क लावत नाही. कारण, आपण पंतप्रधानांचं ऐकतो. मुख्यमंत्री मास्क लावतात पण, मोदी हे देशाचे नेते आहेत. त्यांना कार्यक्रमांमध्ये मास्क न लावलेलं पाहून जनताही मास्क लावत नाही. मी पण मोदींना फॉलो करतो”, असे म्हणत त्यांनी मोदींना टोला लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तिसऱ्या लाटेसाठी राज्याची पूर्ण तयारी! तर ‘ते’ पत्र कधीचं, राजेश टोपेंकडून खुलासा!

News Desk

भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला,महाराष्ट्रातील ‘या’गोष्टी घातल्या राज्यपालांच्या कानावर…

News Desk

‘या’ अधिवेशनात ‘दिशा’ विधेयक नाही

swarit