मुंबई। वेळ आली तर शिवसेना भवन देखील फोडू, असं वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. प्रसाद लाड यांच्या याच वक्तव्याचा समाचार घेतला आहे, तर शिवसेनेचे नेते संजय राऊत प्रसाद लाड यांच्यावर काय बोलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र जास्त काहीही न बोलता संजय राऊतांनी या प्रकरणावर ‘आमचे शाखाप्रमुख बोलतील’, असं म्हणत प्रसाद लाड यांची इज्जत काढली.
महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर
बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही.( समझनेवालोंको इशारा काफी है..)
शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे.
बाटगयांना हे कसे समजणार?— Sanjay Raut (@rautsanjay61) August 1, 2021
काय म्हणाले संजय राऊत?
वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, असं चिथावणीखोर वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर कालपासून संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसेना नेते-कार्यकर्ते-पदाधिकारी लाड यांचा निषेध व्यक्त करत जशास तसं प्रत्युत्तर देत आहेत. आज सकाळी राऊतांना पत्रकार परिषदेत याचविषयी विचारलं असता, त्यांनी प्रसाद लाड यांना महत्त्व न देता त्यांना अनुल्लेखाने मारलं.वेळ आली तर सेना भवन फोडू असं प्रसाद लाड म्हणाले, आपण काय म्हणाल?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर संजय राऊत यांनी ‘आमचे शाखाप्रमुख बोलतील’ एवढ्याच तीन शब्दात लाड यांची इज्जत काढली.
गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपेल
महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही. (समझनेवालोंको इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार?, असं ट्विट करत लाड आणि नितेश राणे यांच्यावर राऊतांनी तुफानी टीका केली आहे.
नितेश राणे काय म्हणाले होते?
शिवसेना भवन हे कलेक्शन भवन झालंय, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती. त्यांच्याही टीकेला राऊतांनी उत्तर दिलंय. काही माणसं गांजा पिऊन बोलतात, त्यांच्याकडे कुठं लक्ष द्यायचं…, असं राऊत म्हणाले.
प्रसाद लाड काय म्हणाले होते ?
नारायण राणे आणि राणे कुटुंबीयांना मानणारा देखील स्वाभिमानचा एक खूप मोठा गट आज राणे साहेबांच्या निमित्तानं, नितेशजीं निमित्तानं भारतीय जनता पार्टीमध्ये आलाय. त्यामुळं भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चितपणे डबल झाली आहे. त्यामुळे नितेशजी पुढच्या वेळेस कार्यकर्ते कमी आणुयात, कारण आपण आलो की पोलिसचं खूप येतात. फक्त त्यांना सांगुयात की ड्रेसमध्ये पाठवू नका म्हणजे त्यांना हॉलमध्ये बसता येईल. “एवढी तुमची आमची भीती तुमची आमची की ह्यांना असं वाटतं की हे माहिम मध्ये आले की सेनाभवन फोडणार आहेत.काय घाबरू नका वेळ आली तर ते देखील करुयात, असं प्रसाद लाड म्हणाले
शिवसेना भवन हे कलेक्शन सेंटर, नितेश राणेंची टीका
मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही. मुंबई ही आमचीही आहे. त्यामुळे शिवसेना भवनसमोर कार्यालय उघडलं असेल तर बिघडलं कुठं?, असा सवाल करतानाच बाळासाहेबांचं शिवसेना भवन आता राहिलं नाही. आताचं शिवसेना भवन हे कलेक्शन सेंटर आहे, अशी घणाघाती टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.