HW News Marathi
महाराष्ट्र

आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू, राऊतांचा भाजपला इशारा

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपण १२० नेत्यांची यादी ईडी आणि अर्थमंत्रालयाकडे सोपवणार असल्याची माहिती दिली आहे होते. शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबद्दल बोलताना त्यांनी महाराष्ट्रात जे मुख्य लोक आहेत त्यांच्यावर दबाव आणून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान आपल्याला अद्याप ईडीची कोणती नोटीस आली नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत होते.

“या सगळ्या चौकशा पूर्ण होऊद्यात नंतर १२० नेत्यांची यादी मी ईडी आणि अर्थ मंत्रालयाकडे पाठवतो. या यादीत सत्ताधारी पक्षातील हे नेते आहेत. मग ईडी कोणाला नोटीस पाठवते हे पाहूयात,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“मला अनेकांनी नोटीस आली का विचारलं. मी वाट पाहतोय आणि आली तरी आश्चर्य वाटणार नाही. मला, अजित पवार किंवा अन्य कोणाला…नोटीस आली तर धक्का बसणार नाही. २० वर्ष जुनी थडगी उकरण्याचं काम सुरु असल्याचं मला कळलं आहे. आम्हीदेखील तयार आहोत,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“देशात इतर काही काम नसेल. घोटाळा करुन लोक देशाबाहेर पळत आहेत. एका वर्षात लोकांची संपत्ती वाढत आहेत्यांची ईडी चौकशी करणार नाही. पण महाराष्ट्रात जे मुख्य लोक आहेत त्यांच्यावर दबाव आणून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मला नोटीस देण्याबद्दल कोणी बोलत असेल तर येऊ देत,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “हे सूडाचं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही. आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू,” असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील ऊस संपेपर्यंत ‘ त्या’ भागातील साखर कारखाने बंद होऊ देणार नाही! – अजित पवार

Aprna

साप अंगावरून गेला अन मी मुख्यमंत्री झालो: शरद पवार

News Desk

बऱ्याच गोष्टी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते, अमृता फडणवीसांचा हिंदुत्वाच्या मुद्यावरुन टोला

News Desk