HW News Marathi
महाराष्ट्र

आपल्या कार्यकर्त्यासाठी भाजप रस्त्यावर, संजय राऊतांचा भाजपला टोला

मुंबई | अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यामुळे भाजपने राज्यभरात आंदोलन पुकारले आहे. पण, ‘अर्णब गोस्वामी हे भाजपचे कार्यकर्ते आहे, आपल्या कार्यकर्त्याने नेमका काय गुन्हा केला आहे, हे एकदा समजून घ्या’, असा सल्लावजा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लगावला आहे. तसंच, ‘अर्णब गोस्वामी हा भाजपचा लाऊड स्पीकर आहे’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे. टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीशी बोलत असताना संजय राऊत यांनी अर्णब गोस्वामी अटक प्रकरणावरून भाजपला खडेबोल सुनावले आहे.

‘अर्णब गोस्वामी हा भाजपचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते हे देशभरात रस्त्यावर उतरले आहे. कदाचित हा त्यांचा राष्ट्रीय कार्यक्रम असेल तर त्यांनी तो करावा. अन्वय नाईक यांच्या मुलीने बुधवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यांच्या मुलीची पत्रकार परिषद ऐकून जर भाजप नेत्याला पाझर फुटली नसेल तर मानवतावाद, न्याय या शब्दांचा वापर करू नये’ असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला.

भाजप नेत्यांनी आंदोलन करण्याआधी अन्वय नाईक यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर काय संकट कोसळले आहे, हे समजून घेतले असते तर कोणत्याही व्यक्तीला मन आहे, मग तो राजकीय नेता असता तर त्याने रस्त्यावर उतरण्याचे काम केले नसते, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही’ असंही राऊत म्हणाले.

‘रिया चक्रवर्ती प्रकरणात तुमची वेगळी भूमिका असते, आणि अन्वय नाईक आणि त्यांच्या आईबद्दल वेगळी भूमिका घेणे याला राज्यकर्म म्हणता येणार नाही. महाराष्ट्राचे पोलीस हे कठपुतलीच्या बाहुल्या नाही. जे रिया चक्रवर्ती प्रकरणात झाले, तसे इथं झाले नाही. महाराष्ट्र पोलीस स्वतंत्र्य पद्धतीने चौकशी करत आहे’ असंही राऊत म्हणाले आहेत.

महाराष्ट्राचे पोलीस म्हणजे कळसूत्री बाहुल्या नाहीत. त्यांनी कारवाई केली याचा राजकारणाशी संबंध नाही. अर्णव गोस्वामी हे भाजप कार्यकर्ते आहेत. सामना शिवसेनेचे मुखपत्र आहे, कार्यकर्त्यांनी कोणत्या प्रकारचा गुन्हा केलाय हे समजायला हवं. त्याच्यावर केलेली कारवाई ही पत्रकार म्हणून नाही. त्याने कोणाला तरी हक्काचे पैसे दिले नाहीत त्यामुळे ते कुटुंब उद्ध्वस्त झालं. त्यातून त्यांनी आत्महत्या केली आणि कोणामुळे आत्महत्या केली ते लिहून ठेवलं, जे सुशांत सिंग प्रकरणात नव्हतं, हेसुद्धा संजय राऊतांनी अधोरेखित केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूजा चव्हाण प्रकरणावर धर्मगुरुंच्या साक्षीने अखेर संजय राठोड बोलणार ?

News Desk

सर्व घटकांना न्याय, शेतकरी व महिलाशक्तीचा गौरव करणार सर्वसमावेशक अर्थसंकल्प! – उपमुख्यमंत्री

Aprna

शिवरायांच्या नावाचा वापर करून फक्त राजकारण केले जाते – संभाजी भिडे

News Desk