HW News Marathi
महाराष्ट्र

संभाजी राजेंचे नाव बिडीला देण्याचे धाडस आपल्या महाराष्ट्रात होते इथेच आपण कमी पडलो! 

मुंबई | छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने पुण्यातील कंपनी बिडी उत्पादन करते. या कंपनीकडून वापरल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला यापूर्वीही विरोध केला होता. आता हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हा मुद्दा समोर आणत छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर थांबवण्याची मागणी केली आहे. रोहित पवार यांच्या पाठोपाठ आमदार नितेश राणे यांनीही याविषयी भूमिका मांडली आहे.

“संभाजी राजेंचे नाव बिडीला देण्याचे धाडस आपल्या महाराष्ट्रात होते इथेच आपण कमी पडलो! यांची आताच हिम्मत मोडली नाही तर उद्या अजुन वाढेल. एकदाच धूर निघाला पाहिजे. हर हर महादेव !,”असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.

रोहित पवार काय म्हणाले होते?

“छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने पुण्यातील एक कंपनी बिडी उत्पादन करते. महापुरुषांच्या नावाचा असा गैरवापर करणं अक्षम्य चूक आहे. लोकभावनेचा विचार करुन संबंधित कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवावा,” अशी मागणी रोहित पवार यांनीही केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकात आज पोटनिवडणूक, भाजपची अग्निपरीक्षा

News Desk

मराठा आरक्षणाचा प्रश्न आता शरद पवारांच्या दरबारी जाणार

News Desk

“शरद पवारांनी २५ वर्षापूर्वी जे सांगितलं, ते आम्हाला २ वर्षापूर्वी कळलं!”

News Desk