HW News Marathi
महाराष्ट्र

“नितिनजी बेळगावात मराठी माणसाला पाडण्यासाठी भाजपकडून तुम्ही सभा घेणार?”

बेळगाव | बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रचारसभेनंतर आता मतदारसंघात शिवसेना विरुद्ध भाजप, असा तुफान सामना रंगण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी काल (१४ एप्रिल) आपल्या प्रचारसभेत तुफान फटकेबाजी केलेली पाहायला मिळाली. यावेळी त्यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तुम्ही बेळगावात मराठी माणसाला पाडण्यासाठी भाजपच्यावतीने सभा घेणार आहात का, असा सवाल विचारला.

मात्र, उद्या बेळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराला आले तरी शुभम शेळके यांचा भरधाव घोडा थांबणार नाही. आईची मुलापासून ताटातूट करण्यासाठी भाजप आणखी काय करणार? शुभमचा विजय हा संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना दिलेली भेट असेल. बेळगावची जनता साद घालेल तेव्हा महाराष्ट्र कायम पाठिशी उभा राहील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

या प्रचारसभेत संजय राऊत यांनी जम्मू-काश्मीर आणि बेळगावची तुलना करत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. पंडित नेहरू यांनी काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देऊन चूक केली होती. ती चूक भाजपने दुरुस्त केली ना? मग आता पंतप्रधान मोदींनी बेळगावमध्ये येऊन ही चूकही दुरुस्त करावी, असे राऊत यांनी म्हटले.

सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर जाहीर केली पोटनिवडणूक

भाजप खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या १७ एप्रिलला बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून २ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपाल-उद्धव ठाकरे ,अजित पवार भेटीत नेमकं काय घडलं ? १२ आमदारांबद्दल राज्यपाल काय म्हणाले ?

News Desk

बीपीएल रेशनकार्ड धारकांची क्रुर चेष्टा, मिळणार फक्त अर्धा किलो साखर

News Desk

अखेर मनसेपुढे ॲमेझाॅनची माघार, मराठी भाषेचा समावेश लवकरच करणार  

News Desk