HW News Marathi
महाराष्ट्र

भोकर, बेंबर संयुक्त वन व्यवस्थापन समितीला ” संत तुकाराम वन ग्राम पुरस्कार “

जल,जंगल आणि जमीन या तिन्ही बाबींसाठी राज्य शासन महत्वपूर्ण पाऊले उचलणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उत्तम बाबळे

नवी मुंबई :- पर्यावरणाच्या दृष्टीने आणि एकूणच आपल्या जीवनमानावर लक्षणीय परिणाम करणाऱ्या जल,जंगल व जमिन या तिन्ही बाबींसाठी राज्य शासनाने महत्वपूर्ण पाऊले उचलली असून यामुळे येणाऱ्या काही वर्षांत पर्यावरण संतुलनाचे फायदे दिसून येण्यास सुरुवात होईल असे मनोगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ जुलै रोजी ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ व संत तुकाराम वन ग्राम पुरस्कार प्रदान सोहळ्या प्रसंगी ऐरोली येथे बोलतांना व्यक्त केले आहे.

ऐरोली सेक्टर १० येथे कोस्टल एंड मरीन बायोडायव्हर्सिटी सेंटरच्या प्रांगणात १ जुलै २०१७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन मंत्री केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी,अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार,पालकमंत्री एकनाथ शिंदे, सदगुरु जग्गी वासुदेवजी,आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम,महापाैर सुधाकर सोनवणे,आमदार मंदा म्हात्रे,ईशा फाऊंडेशनचे विश्वस्त कृष्णा अरुप, सामाजिक वनीकरणचे प्रधान मुख्य वन संरक्षक अनुराग चौधरी आदींच्या उपस्थितीत ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शभारंभ करण्यात आला. उपरोक्त मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळ्याचे प्रास्ताविक करतांना वनमंत्री सुधीर मूनगंटीवार यांनी राज्य ३३ टक्के हरित करणारच असा निर्धार केला व पुढील तीन वर्षांत वन विभागाच्या माध्यमातून ५० कोटी झाडे कोणत्याही परिस्थितीत लावणार असे सांगून या चालू सप्ताहात ४ कोटींपेक्षा जास्त रोपे लावूत अशी आशा व्यक्त केली. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की,देशभरातील राष्ट्रीय महामार्गालगत देखील आम्ही मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याचे नियोजन केले आहे.आगामी काळात पर्यावरणपूरक इंधनावर आम्ही भर देणार असून नागपुरात आम्ही बायो इथेनॉलवर चालणारया ५५ बसेस सुरु केल्या आहेत. तर पुढे बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,जलयुक्त शिवार योजनेतून अनेक नाहीसे झालेले स्त्रोत जिवंत करण्याचे काम सुरु आहे तसेच गाळ्मुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेत जमिनीचा कस कसा वाढेल आणि ती सुपीक कशी होईल असा प्रयत्न आम्ही करीत आहोत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज, ट्विटर आणि जी प्लसला लाईक करा

https://www.facebook.com/mahabatmi365/

https://twitter.com/Mahabatmi1

https://plus.google.com/u/0/

 

भोकर तालुक्यातील बेंबर संयुक्त वन व्यवस्थापन समितीला ” संत तुकाराम वन ग्राम पुरस्कार ” प्रदान

याप्रसंगी उपरोक्त मान्यवरांच्या हस्ते सावनेर तालुक्यातील सोनापूर गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीला १० लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार देण्यात आला तर ५ लाख रुपयांचा द्वितीय पुरस्कार विभागून निलंगा तालुक्यातील लांबोटा आणि सिधुदुर्ग जिल्ह्यातील पवनपार संयुक्त वन व्यवस्थापन समितीला देण्यात आला. ३ लाख रुपयांचा तृतीय पुरस्कार विभागून गोंदिया जिल्ह्यातील नवाटोला आणि भोकर तालुक्यातील बेंबर संयुक्त वन व्यवस्थापन समितीला देण्यात आला.बेंबरचा सदरील पुरस्कार वन परिक्षेत्र अधिकारी के.डी.देशमुख,वनपाल जी.बी.राठोड,समिती अध्यक्ष जयवंतराव गरके,सरपंच मारोतराव केंचे,उपसरपंच नागोराव भोसले,उपसरपंच गोविंदराव डोईफोडे यांना देऊन सन्मानित करण्यात आले.के.डी.देशमुख यांच्या अतुलनीय कार्याची यावेळी प्रशंषा करण्यात आली असून संयुक्त वन व्यवस्थापन समिती बेंबर ता.भोकरचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विखे पाटील-बाळासाहेब थोरात एकमेकांवर टीका, नंतर एकाच सोफ्यावर बसून गप्पा

News Desk

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; भाजप आणि मविआ कोणाच होणार विजय

Aprna

केंद्राकडून आरोग्यविभागाला पीपीई किट्स, आणि व्हेंटीलेटर पुरवण्यात येणार

News Desk