HW News Marathi
Covid-19

साताऱ्यात आजपासून काय सुरु आणि काय बंद? जाणून घ्या…

सातारा | सातारा जिल्हयातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी निर्बंधांचे स्तराबाबत आदेश पारित केला असून, कोविड-19 प्रतिबंधात्मक उपायोजनेंतर्गत साथरोग कायदा 1897, कलम 2 नूसार दिलेल्या अधिकाराच्या अंतर्गत, त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 याच्या तरतुदी नूसार त्या-त्या जिल्ह्यतील कोविड बाधीत रुग्णांचा पॉझीटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडस व्यापलेची टक्केवारी नुसार एकूण पाच स्तर निश्चित केलेले असुन, त्या-त्या स्तरानुसार संबंधीत जिल्ह्यामध्ये निर्बंध शिथिल करणेत आलेले आहेत.

सातारा जिल्ह्यामध्ये कोविड बाधीत रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडस व्यापलेची निकषानुसार शासनाने घोषित केलेल्या स्तरानुसार, सातारा जिल्हा चौथ्या स्तरामध्ये समाविष्ट होत आहे.कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सातारा जिल्हयातील वाढत्या रुग्णांची संख्या पहाता, जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठीसाठी सद्यस्थितीत लागू असलेल्या निर्बंधानुसार जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी पुढील आदेश जारी केले आहेत.

सातारा जिल्ह्यात काय सुरु काय बंद ?

* अत्यावश्यक दुकाने/आस्थापना या सकाळी 9.00 ते दुपारी 02.00 वा. पर्यत चालू ठेवण्यास परवानगी

* मेडिकल/औषधांची दुकाने सकाळी 9.00 ते सायं 8.00 वाजेपर्यंत चालू .

* अत्यावश्यक नसलेली दुकान या पुर्णपणे बंद. मॉल / सिनेमागृहे (एक किंवा अनेक पडदी)/ नाटयगृहे इ. पुर्णपणे बंद.

* हॉटेल, रेस्टॉरंटस्‍ ही केवळ पार्सल घरपोचसाठी सकाळी 9 ते रात्री 8 वा. पर्यंत परवानगी. या ठिकाणी बसण्यासाठी परवानगी नाही.

* सार्वजनिक जागा/खुली मैदाने/ चालणे/सायकल चालविणे यासाठी सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये सकाळी 05.00 ते सकाळी 9.00 या वेळेत परवानगी .

* ज्या खाजगी कार्यालयांना मुभा देण्या आलेली कार्यालये वगळता इतर सर्व खाजगी कार्यालये बंद . * शासकीय कार्यालये व ज्या खाजगी कार्यालयांना परवानगी देण्यात आलेय कार्यालयांना 25 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी

* खुल्या जागेतील क्रिडा विषयक बाबी या सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये सकाळी 05.00 ते सकाळी 9.00 या वेळेत चालू ठेवणेस परवानगी

* शेतकरी यांना आवश्यक असणारी बियाणे, खते, शेती विषयक उपकरणे व त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवांची दुकाने दुपारी 02.00 वा पर्यत परवानगी

* शेती विषयक (मशागत) करण्याची सेवा करणेस सायंकाळी 04.00 वा पर्यत परवानगी

ई-कॉमर्सच्या वस्तू तसेच सेवा या फक्त्‍ अत्यावश्यक बाबीसाठीच चालू ठेवण्यास परवानगी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भूमिपुत्रांच्या रोजगाराच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

News Desk

जागतिक हास्य दिनी रोहित पवार, जयंत पाटील यांनी विरोधकांची घेतली ‘अशी’ फिरकी

News Desk

राज्यात आतापर्यंत सात लाखांहून अधिक चाचण्या । राजेश टोपे

News Desk