HW News Marathi
महाराष्ट्र

दिवाळीनंतर शाळा सुरु करणे अशक्य,बच्चू कडूंचा इशारा!

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यातील शाळा-महाविद्यालये बंद आहेत. दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचे संकेत शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. मात्र, दिवाळीनंतरही कोरोनाचे प्रमाण वाढतच राहिल्यास राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा सुरू करणे अशक्‍यच राहील, अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने लस आल्याशिवाय शाळा सुरू करू नये, अशी मागणी करण्यास सुरुवात केली झाली आहे. दिवाळीनंतर कोरोनाविषयी राज्य सरकारने जाहीर केलेले नियम पाळून शाळा सुरू करण्याचे संकेत सरकारकडून देण्यात आले आहेत. मात्र, कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता बच्चू कडू यांनी वरील अंदाज व्यक्त केला आहे.

“आपण ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये आणि आता दिवाळीनंतर शाळा सुरू करता येईल का, याचा विचार करत होतो. जर दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट आली आणि संक्रमण वाढले, तर आपल्याला दिवाळीनंतरही शाळा बंदच ठेवाव्या लागणार आहेत. कदाचित आतापेक्षा कोरोनाचे संक्रमण कमी झाले आणि आपल्याला वाटले शाळा सुरू करायला हरकत नाही, तेव्हा शाळा सुरू करता येईल. परंतु आपण जगाचा विचार केला तर ब्रिटनमध्ये 13 हजार विद्यार्थी कोरोनाबाधित झाले आहेत“, असेही राज्यमंत्री कडू म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाणी शेतातही अन् डोळ्यातही… हिंगोलीतील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला; काय झालं?

Aprna

#COVID19 : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ८९१ वर, धारावीमधील रुग्णांच्या संख्येत वाढ

News Desk

खासदार आणि आमदारांच्या घोटवलेल्या पगारांचे केंद्राने, राज्याने काय केले? – उदयनराजेंचा सवाल

News Desk