HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यात मुसळधार पावसामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

पुणे | पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामतीमध्ये काल (२५ सप्टेंबर) रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पाऊसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पाच तालुक्यातील शाळांना आणि महाविद्यालयांना आज (२६ सप्टेंबर) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत मुसळधार पावसामुळे पुण्यात आतापर्यंत एकूण ९ जणांचे बळी घेतल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त डी. वेंकटेशम यांनी दिली

गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. काल रात्री शहरात झालेल्या पावसाचा जोर वाढला. मुसळधार पावसाने पुणे शहराला अक्षरशः झोडपून काढले. शहरातील सर्वच भागात रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. त्यात अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेक लोक वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शहरात अतिवृष्टी होत असल्याने तसेच आपत्कालीन परिस्तिथी निर्माण झाली असल्याने पुणे जिह्यातील पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या ५ तालुक्यांच्या शाळांना आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोकणावासीयांच्या घरावरुन नांगर फिरु देणार नाही

swarit

राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध | मुख्यमंत्री

swarit

पंढरपूरचा पांडूरंग भाजपला पावला ! भगिरथ भालकेंचा धुव्वा उडवत समाधान अवताडे विजयी

News Desk