HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार; वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई | कोरोना आणि ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा व महाविद्यालयं बंद करण्यात आली होती. मात्र, शाळा सुरू करण्याबाबत सर्व स्तरातून मागणी होत असल्यामुळे शालेय शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. 

येत्या सोमवारपासून म्हणजेच २४ जानेवारीपासून राज्यातील पहिली ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. गायकवाड म्हणाल्या, शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक स्तरावर अधिकार देण्यात यावे यासाठी अनेकजण मागणी करत होते. त्यानुसार सोमवारपासून शाळा सुरू कराव्यात यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. यावर मुख्यमंत्र्यांनीही मंजूरी दिली असल्याचं गायकवाड यांनी यावेळी सांगितलं आहे.

गायकवाड म्हणाल्या, शाळा सुरू करण्याचे निर्णय हे स्थानिक प्रशासन, शाळा आणि पालक घेतील. तसेच ज्या ठिकाणी रुग्ण संख्या कमी आहे, अशा ठिकाणी कोविड १९ च्या सर्व प्रोटोकॉलचं काटेकोरपणे पालन करूनच या शाळा सुरू केल्या जातील. त्याचबरोबर गेल्या २ वर्षांपासून आपण कोरोना संकटांचा सामना करत असून यामध्ये विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि त्यांची सुरक्षितता याला आम्ही नेहमीच प्राधान्यता दिली आहे. त्यामुळे आता सुद्धा पूर्ण काळजी घेऊनच शाळा सुरू करण्यात याव्या, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भेंडवळची भविष्यवाणी : यंदा राज्यात सर्वसाधारण पाऊस, देशात स्थिर सरकार येणार !

News Desk

‘आंचल गोयल यांना पदभार घेण्यास कोण रोखत होतं?’ संजय जाधवांनी केला खुलासा

News Desk

देशाला स्मशानभूमी करणाऱ्या मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस देवेंद्र फडणवीसांनी करावे !

News Desk