HW News Marathi
महाराष्ट्र

देशाला स्मशानभूमी करणाऱ्या मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस देवेंद्र फडणवीसांनी करावे !

मुंबई | कोरोनाला गांभीर्याने न घेतल्यानेच कोरोना संकट हाताळण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. खा. राहुलजी गांधी यांनी १२ फेब्रुवारी २०२० रोजीच कोरोना त्सुनामी सारखे संकट असल्याचा इशारा दिला होता परंतु मोदींपासून देवेंद्र फडणवीसापर्यंत भाजप नेत्यांनी आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही असे म्हणत दुर्लक्ष केले. परिणामी आज देशात दररोज ४ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण तसेच ४ हजारांपेक्षा जास्त मृत्यू होत आहेत.

याला सर्वस्वी केंद्रातील भाजप सरकारचा अहंकार आणि गलथानपणा जबाबदार आहे. सोनियाजी गांधी यांना पत्र लिहून देशाचे स्मशान बनविणा-या नरेंद्र मोदींच्या पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत. त्यांनी मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस दाखवावे, असे घणाघाती उत्तर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेताना ते म्हणाले की, कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती असून मोदी सरकारने यासंदर्भातील सर्व अधिकार केंद्राकडे घेऊन राज्यांना रामभरोसे सोडले. मोदींकडे ठोस धोरण नाही आता परिस्थिती हाताबाहेर गेल्याने भाजप नेते सैरभेर झाले आहेत. पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघात मृतदेह जाळण्यासाठी जागा नाही हे विदारक दृश्य जगभरातील माध्यमे दाखवत आहेत. ७० वर्षात कधी भारताची झाली नव्हती एवढी नाचक्की मोदींच्या मनमानी कारभारामुळे झाली आहे.

मोदी सरकारने राज्यांना भरभरून रेमडेसीवर, ऑक्सीजन व वैद्यकीय मदत पुरवली असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस खोटारडे आहेत.यावर सर्वोच्च न्यायालय आणि देशातील अनेक उच्च न्यायालयांनी शिक्कामोर्तब केले आहे. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत टास्क फोर्स नेमून सर्वोच्च न्यायालयाने मोदींच्या अकार्यक्षमतेवर शिक्कामोर्तबच केले आहे. पीएम केअरमधून ऑक्सिजन प्लँट उभारण्याच्या फक्त घोषणा केल्या प्रत्यक्षात केंद्राने आजपर्यंत महाराष्ट्रात एकही ऑक्सीजन प्लँट उभारला नाही.

महाराष्ट्राची रोजची ऑक्सीजनची गरज १७५० मे. टन आहे. यातील १२०० मे टन महाराष्ट्रात निर्माण केला जातो यात मोदी सरकारचे काही योगदान नाही. ५५० मे टन अधिकचा ऑक्सिजन हवा होता तेही मोदी सरकार पुरवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. देशातील जनता रेमडेसीवीर मागत असताना भाजपाचे नेते रेमडेसीवीरचा काळाबाजार करण्यात व्यस्त होते. स्वतः देवेंद्र फडणवीसही एका काळाबाजार करणा-या कंपनीच्या लोकांना वाचविण्यासाठी मध्यरात्री पोलीस स्टेशनला जाऊन गोंधळ घालत होते.

जग लसीकरणात व्यस्त असताना मोदी निवडणूक प्रचारात व्यस्त होते. मोदी सरकारकडे लसीकरणाचे राष्ट्रीय धोरणच नाही. लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण केंद्रे बंद आहेत.लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद केल्याची घोषणा केली असताना केंद्राला १५० रुपये, राज्यांना ४०० रुपयांना खासगी व्यक्तींना ६०० रूपयांना ती विकत का घ्यावी लागत आहे. एवढे अडथळे असतानाही महाराष्ट्राने आतापर्यंत विक्रमी १ कोटी ९५ लाख ३१ हजार नागरिकांचे लसीकरण केले जे देशात सर्वात जास्त आहे. दररोज सहा लाख नागरिकांच्या लसीकरणाची महाराष्ट्राची क्षमता आहे. वेस्टेजही देशात सर्वात कमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निती आयोगासह जागतिक स्तरावरही मुंबईच्या कोरोना नियंत्रण मॉडेलचे कौतुक केले आहे.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने नोंदणीकृत रिक्षा चालक, कामगारांसह आर्थिक दुर्बल घटकांसाठी प्रत्येकी १५०० रुपयांची थेट मदत देण्यासाठी ५४७६ कोटींचे पॅकेज दिले आहे. कोरोना काळात गोरगरिबांना मोफत शिवभोजन थाळी दिली जात आहे. सुमारे सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे मोफत अन्नधान्य देण्यात येत आहे. ही सर्व मदत लाभार्थ्यांना पोहचली आहे. मोदी सरकारने जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पोकळ पॅकेजचे काय झाले? हे फडणवीसांनी सांगावे.

काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधींना पत्र लिहीण्याऐवजी फडणवीसांनी नमामी गंगेला शवामी गंगे बनविणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, गोव्यात ऑक्सिजन अभावी रूग्ण तडफडून मरत आहेत त्या गोव्याचे मुख्यमंत्री, गुजरातमध्ये लाखो लोकांच्या मृत्यूचे आकडे लपवले जात आहेत त्या गुजरातचे मुख्यमंत्री आणि या सर्वांचे पालक ज्यांच्या गलथानपणामुळे देशात कोरोना स्थिती बिकट झाली आहे त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहायला हवे होते, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांचे सोनिया गांधी यांना पत्र

काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी अलिकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेली पत्रं आणि विविध काँग्रेस नेत्यांची वक्तव्य डोळ्यापुढे ठेवत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र सोनिया गांधी यांना पाठविले असून, त्यांना महाराष्ट्रातील स्थितीची आणि त्याचा संपूर्ण देशातील कोरोना लढ्यावर होणारा परिणाम याची जाणीव करून दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा”

Aprna

महाराष्ट्रात सायबर इंटिलिजन्स युनिट उभारणार

Manasi Devkar

‘त्या’ विधानावर दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण….!

News Desk