HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवार आणि भाजपच्या राम शिंदेंची गुप्तभेट ! चर्चा सुरू

मुंबई । राज्यात जाहीर आणि गुप्तभेटींचा हंगाम सुरू आहेच. अहमदनगरमधूनही अशाच एका गुप्तभेटीचे वृत्त समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जाणारे भाजप नेते राम शिंदे यांच्यात शनिवारी (१२ जून) गुप्त बैठक पार पडल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या बैठकीत कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्याबाबत चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. परंतु, साखर कारखान्यावर चर्चा करण्यासाठी गुप्तबैठक का ? असाही सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, राम शिंदे यांनी मात्र हे भेटीचे वृत्त पूर्णपणे नाकारल्याने याबाबतचा संभ्रम कायम आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्याबाबत शनिवारी अजित पवार आणि राम शिंदे यांच्यात एक गुप्तबैठक झाली. ही बैठक साधारणतः अर्धा तास चालली. मात्र, साखर कारखाना इतकाच ह्या भेटीतील चर्चेचा विषय होता की अन्यही कोणत्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली ? हा प्रश्न कायमच आहे. राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकारी असल्याने अजित पवार आणि त्यांची भेट आणखी विशेष ठरते. म्हणूनच, याबाबत आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

कोण आहेत राम शिंदे?

देवेंद्र फडणवीसांचे सरकार असताना राम शिंदे हे मंत्री होते तर ते भाजपचे महत्त्वाचे नेते आणि फडणवीसांचे विश्वासू मानले जातात. २०१९ च्या विधानसभेत कर्जत-जामखेड मतदारसंघात राम शिंदे विरुद्ध रोहित पवार अशी लढत झाली होती. मात्र, या अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत राम शिंदेंना धक्का बसत रोहित पवार यांचा विजय झाला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आष्टी’च्या सहायक पोलिस निरीक्षकांच्या चौकशीसाठी विशेष अधिकारी! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

विधानसभा निवडणुकीत सरकार स्थापन करणारे तुमचे बाप कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे 

News Desk

सांगलीतल्या पूरग्रस्त महिलांनी अजित पवारांजवळ मांडल्या व्यथा…!

News Desk