नवी दिल्ली | देशात एकीकडे पुन्हा एकदा कोरोना रूग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे कोरोनावरील लसीकरण सुरु आहेच. गेले अनेक महिने आरोग्य कर्मचारी यांना कोरोनावरील लस दिली जात होती. मात्र, आता केंद्राने ज्येष्ठ नागरिकांनाही कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला आहे. १ मार्चपासून ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम सुरु होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.
तसेच, ४५ पेक्षा जास्त ज्यांचे वय आहे त्यांना आणि प्रकृती गंभीर असेल अशा लोकांनाही लस देण्यात येणार आहे. १० हजार सरकारी आणि २० हजार खासगी केंद्रावर लस दिली जाणार असल्याचीही माहितीही त्यांनी दिली आहे. तसेच, ज्यांना खासगी रुग्णालयातून लस घ्यायची असेल त्यांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे. मात्र, ही किंमत किती असणार याची माहिती आरोग्य विभागाकडून ३-४ दिवसात देणार असल्याची माहितीही जावडेकर यांनी दिली आहे.
From March 1, people above 60 years of age and those above 45 years of age with comorbidities will be vaccinated at 10,000 govt & over 20,000 private vaccination centres. The vaccine will be given free of cost at govt centres: Union Minister Prakash Javadekar#COVID19 pic.twitter.com/Rxhkkk8eSC
— ANI (@ANI) February 24, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.