HW News Marathi
महाराष्ट्र

ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे निधन

मुंबई | शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एन. डी. पाटील यांना ब्रेन स्ट्रोक आल्याने गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. एन. डी. पाटील यांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी कोरोनाचा संसर्ग झाला होता. तेव्हा पाटील यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. एन. डी. पाटील हे नेहमी कामगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढत राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे हे कोल्हापूरात जावून पाटील यांच्या कुटुंबियांचे सांत्वना करणार आहेत. 

एन. डी. पाटील यांचा जन्म १५ जुलै १९२९ रोजी सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) येथील शेतकरी कुटुंबात झाला होता. नारायण ज्ञानदेव पाटील हे त्यांचे पूर्ण नाव आहे. एन. डी. पाटील यांना अर्थशास्त्र विषयात एम. ए. ची पदवी घेतली असून त्यांनी पुणे विद्यापीठातून ते एल. एल. बीचे शिक्षण पूर्ण केले होते.  एन. डी.  पाटील यांनी १९५४ ते १९५७ साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये प्राध्यापक राहिले होते. तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर देखील होते. १९६० साली इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये प्राचार्य होते. 

डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी वर्गाप्रती आस्था असलेला, जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला आहे. उपेक्षित लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी विधिमंडळातही आवाज उठवला, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजवले, असे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.

एन. डी. पाटील यांची राजकीय कारकीर्द

  • १९४८  – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश
  • १९५७ – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस
  • १९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य
  • १९६९- १९७८, १९८५ – २०१० – शे.का.प.चे सरचिटणीस
  • १९७८-१९८० – सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य
  • १९८५-१९९० – महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )
  • १९९९-२००२ – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार
  • महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते

एन. डी. पाटील यांना मिळालेले पुरस्कार/ सन्मान 

  • भाई माधवराव बागल पुरस्कार – १९९४
  • स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९
  • राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – १९९८ – २०००
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, २०००
  • विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद – २००१
  • शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी
  • शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरेवाडीच्या विकासासाठी केंद्राकडून निधी आणणार! – देवेंद्र फडणवीस

Aprna

कुठलीही गर्दी न करता कार्तिकी वारी साधेपणाने पार पाडा – मुख्यमंत्री

News Desk

नांदेडचा महापौर बाहेरचा मंत्री येऊन ठरवणार का ? नांदेडचा महापौर हा नांदेडची जनताच ठरवणार.

News Desk