HW News Marathi
महाराष्ट्र

आरेवाडीच्या विकासासाठी केंद्राकडून निधी आणणार! – देवेंद्र फडणवीस

मुंबई | राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगली येथील श्री बिरोबा यात्रेत सहभागी होऊन श्री बिरोबाचे दर्शन घेतले. देवस्थान कमिटीने व समाजातील मंडळीने देवेंद्र फडणवीस यांचे धनगरी ढोलाच्या गजरात स्वागत गेले. घोंगडी, घुंगराची काठी व मानाचा फेटा देण्यात आला. यावेळी त्यांनी आरेवाडीच्या विकासासाठी केंद्राकडून निधी आणणार असल्याची ग्वाही दिली. फडणवीस म्हणाले, “मी मुख्यमंत्री असताना बिरोबा देवस्थानासाठी ५ कोटी मंजूर केले होते. यापैकी काही काम झाले. आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले की, १६५ कोटींचा विकास आराखडा तयार आहे. तो राज्य सरकारनेच केंद्राकडे पाठवायचा असतो. आम्ही विकासाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठल्यावर केंद्राची मदत व निधी आणू.”

यावेळी फडणवीस पुढ बोलताना म्हणाले, “श्री बिरोबा महाराष्ट्रातील तमाम बहुजन धनगर व सर्वच समाजाचे आराध्य दैवत आहेत. कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश अशा अनेक राज्यातून लोक इथे दर्शनासाठी लोक येतात त्यामुळे राष्ट्रीय ख्यातीच्या या मंदिरासाठी केंद्र मदतीला सकारात्मकता दाखवेल, आपण बिरोबाच्या नावाने चांगभले म्हणतो म्हणजे सर्वांचे भले होईल. चांगभले म्हणजे बहुजन समाजाचे पसायदन आहे. सर्वांचे भले होण्यासाठी मी श्री भगवान बिरोबाकडे साकडे घातले आहे.” यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, सुधीर गाडगीळ आदी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्ता गेल्यानंतर तुमच्या वृत्तीमधला हा बदल आम्ही ‘ बंगला सोडतानाही पाहिला – रुपाली चाकणकर

News Desk

उदयनराजे-निंबाळकर यांच्या वादात शरद पवारांची मध्यस्थी

News Desk

डॉ.कृष्णा किरवले यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करा : रामदास आठवले

News Desk