HW News Marathi
महाराष्ट्र

ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन

मुंबई | ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे आज निधन झाले आहे. जोशींचे वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी  आणि एक सच्चे शिवसैनिक म्हणून ओळख होती. जोशींचे आज (१७ फेब्रुवारी) मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. जोशी हे १९७३ मध्ये मुंबईचे शिवसेनेचे दुसरे महापौर झाले होते. जोशी हे पहिल्या युतीच्या सरकारच्या काळात त्यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेटपदही भूषावले आहे. त्यांनी महसूलमंत्री म्हणून काम काम पाहिले आहे.

सुधीर जोशी हे १९६८ साली प्रथम नगरसेवक झाले होते. मुंबई महानगरपालिका गटनेता, विरोधी पक्षनेता म्हणून देखील काम केले होते. १९६८  साली ते विधान सदस्य होते.  तर १९९२-९३ या दरम्यान जोशींनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते. शिवशाही सरकारमध्ये जोशींनी जून १९९५ ते मे १९९६ या कालखंडात प्रथम महसूल मंत्री होते. यानंतर १९९६ ते १९९९ पर्यंत शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत होते. 

जोशींच्या निधनानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले, “शिवसेनेच्या अनेक कार्यक्रमात जोशी हे नेहमी मार्गदर्शनकडून आम्ही शिकलो. जोशींनी भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळवण्यासाठी त्यांनी आंदोलन केले. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात जोशी हे आघाडीवर होते. जोशींनी महसूल मंत्री, शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम केले.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपूर पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का देत राष्ट्रवादीत येणारे कल्याणराव काळे आहेत कोण?

News Desk

नवी मुंबईत आधार कार्डसाठी मध्यरात्रीपासून रांगा

swarit

राज ठाकरे यांचा राज्यपाल कोश्यारींना इशारा, मराठी माणसाला डिवचू नका!

News Desk