HW News Marathi
महाराष्ट्र

#CoronaVirus : शेअर मार्केटमधील पडझड अजूनही सुरूच, सेंसेक्स तीन हजार अंकांनी कोसळला

मुंबई | देशात कोरोना व्हायरसने थैमना घातला आहे. कोरोनाचा प्रर्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय केला आहे. राज्यात जमाव बंदील लागू झाल्यानंतर आज (२३ मार्च) आठवड्याच्या पहिल्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर मार्केटने तीन हजाराहून अधिकांनी कोसळला आहे. यामुळे आजचा दिवश शेअर मार्केटसाठी ब्लॉक मंडे आहे. सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग पाहात केंद्र आणि राज्य सरकारने नागरिकांना घरात राहण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे उद्योगधंदे बंद आहे.

शेअर मार्केट सेंसेक्स २३०७.१६ अंकांनी कोसळला, तर निफ्टी ८.६६ टक्क्यांनी घसरला आहे. शेअर बाजारातील १५० शेअर्सनी लोअर सर्किट गाठले. त्यामुळे शेअर मार्केटमधील व्यवहार अर्ध्या तास बंद ठेवण्यात आले होते. यानंतर पुन्हा एकदा शेअर मार्टेक सुरू झाल्यावर शेअर बाजारात पुन्हा एकदा मोठी पडझड झाली. त्यामुळे ३१४९.८६ अंकांनी घसरून २६ हजार ७६६.१० पर्यंत खाली आला, तर निफ्टी ७९४५.७० अंकांपर्यंत खाली आला.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाबरी मशिदचा निर्णय देशहिताचा नाही – प्रकाश आंबेडकर

News Desk

हिंगणघाट जळीत कांडातील पीडित तरुणीची मृत्यूशी झुंज अपयशी

swarit

एसटी महामंडळ सर्वसामांन्यांसाठी लवकरच पेट्रोल पंप सुरु करणार ..!

News Desk