HW News Marathi
Covid-19

सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने कोरोना लसीची किंमत ठरवली !

पुणे | कोरोनावरील लस लवकर तयार व्हावी आणि नागरिकांसाठी ती उपलब्ध व्हावी यासाठी संपूर्ण जगातून प्रयत्न सुरूच आहेत. मात्र कोरोना लस आल्यानंतर ती सुरक्षित आणि स्वस्तदेखील असावी यासाठी भारत प्रयत्नशील आहे. फक्त भारताच नव्हे तर जगातील गरीब, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना अशी परवडणारी लस उपलब्ध करून देण्याचा भारताचा मानस आहे आणि त्या दिशेने आता पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

 

सीरम इन्स्टिट्युटने GAVI या आंतरराष्ट्रीय लस संस्थेशी आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनशी भागीदारी केली आहे. जवळपास १०० दशलक्ष डोस पुरवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या तिन्ही संस्था मिळून भारतासह इतर गरीब देशांसाठी २०२१ पर्यंत १०० दशलक्ष कोरोना लसीचे उत्पादन करतील अशी आशा आहे. या लसीची किंमत ३ यूएस डॉलर म्हणजे भारतीय किमतीत फक्त २२५ रुपये असेल. यासाठी गेट्स फाऊंडेशन १५० मिलियन डॉलर्सचा निधी देणार आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषधं निर्माण करणारी कंपनी आहे. औषध निर्माण करणारी जगातली सर्वोत्तम संस्था म्हणून ओळखली जाते. जगभरात सध्या जवळपास १४० कोरोना लशींवर काम सुरू आहे. यापैकी काही लशी ह्युमन ट्रायलच्या टप्प्यात आहेत. सीरम इन्स्टिट्युटनेही ऑक्सफर्ड-AstaZeneca आणि अमेरिकेच्या Novavax या कंपनीसह लशीबाबत करार केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…मग कोरोना लढाईत आरोपींना अटकच करणे बंद करणार का?”

News Desk

देशावर महामारी आणि आर्थिक संकट येणार…काय आहे भेंडवळची भविष्यवाणी?

News Desk

राज्यात आज १८ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद 

News Desk