HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे गर्दी केली नाही, शिवसेना नेत्याची क्लीनचीट

मुंबई | पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावर शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे राठोड यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणात त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं. मात्र संजय राठोड पोहरादेवी येथे येणार असल्यानं त्यांच्या समर्थकांनी तिथं मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तिथं झालेल्या गर्दीवरून सध्या सरकारवर टीका होत आहे.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मात्र या प्रकरणात संजय राठोडांना क्लीनचिट दिली आहे. संजय राठोड यांनी तिथं गर्दी केली नाही. ते तिथं देवदर्शनासाठी गेले होते. त्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचं पालन न करणाऱ्यांवर चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. तिथं गर्दी करण्यामागे संजय राठोड आणि मंदिरातील महंत जबाबदार नसल्याचं स्पष्टीकरण यावेळी शंभूराज देसाई यांनी दिलं आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधत सार्वजनिक कार्यक्रम, धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत गर्दी न करता साजरे करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र संजय राठोड हे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर प्रथमच बोलणार असल्यानं सकाळपासूनच त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोहरादेवी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

या प्रकरणात हजारो लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, या प्रकरणावरून शरद पवार नाराज असल्याची चर्चा  होत होती, मात्र संजय राठोड प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा शरद पवार कोणीही नाराज नसल्याचं शंभूराज देसाईंनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागणार का? हे पाहणे महत्वाचे असणार.

Related posts

पंतप्रधानांनी मराठीत केलं ट्विट, मोदींनी दिले महाराष्ट्र सरकारला सहकार्याचं आश्वासन

News Desk

महिलांना स्व-संरक्षणाचे धडे

News Desk

मोदींचे सरकार आले, आता अयोध्येत राम मंदिर होणारच !

News Desk