मुंबई | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज (३१ ऑगस्ट) अचानक बैठक झाली. यशवंतराव चव्हण सेंटरमध्ये ही बैठक पार पडली. दरम्यान, शरद पवार यांनी पार्थ पवारांना फटकारल्यानंतर पवार कुटुंबात जे राजकीय नाट्य घडले त्यानंतर अजित पवार आणि शरद पवारांची ही दुसरी भेट आहे. दरम्यान, अचानक ही भेट का झाली यावरुन आता राजकीय वर्तृळात चर्चा सुरु झाल्या आहेत. पार्थ पवारांबद्दल त्यांच्यात काही बोलणे झाले असेल का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. विविध विषयांवर त्यांच्या चर्चा झाल्याच माहिती मिळाली आहे. साधारण २ तास त्यांच्यात चर्चा झाली अशी माहिती आहे. मात्र, नक्की का ही भेट झाली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या असे म्हटले जात आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या म्हणण्याला कवडीची किंमत देत नाही, अशा शब्दांत जाहीररित्या फटकारले होते. यावरुन पार्थ पवार काय पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. तसेच, पवार कुटुंबाकडून पार्थ पवार यांची नाराजी दुर करण्याचे प्रयत्नही करण्यात आले होते. आणि त्यानंतर अजित पवार आणि शरद पवारांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तृळात पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.