रायगड | निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आणि नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज आणि उद्या कोकण दौरा करणार आहेत. यासाठी ते कोकणात पोहोचले आहेत. शरद पवार यांनी सर्वात आधी रायगड येथील माणगाव येथे पोहोचून परिस्थितीची माहिती घेतली.
यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे आणि पालकमंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या. यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून शरद पवारांना परिस्थिती जाणून घेतली.
शरद पवार आज ( ९ जून) माणगाव, म्हसळा, दिवेआगार, श्रीवर्धन येथील दौरा केल्यानंतर ४ वाजता श्रीवर्धन येथे आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी हरिहरेश्वर येथे जाणार आहेत आणि नंतर बागमांडला मार्गे दापोलीकडे रवाना होणार आहेत.
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा अदमास घेण्यासाठी व मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी आज कोंकण दौऱ्यास सुरुवात केली. माणगांव बाजारपेठ येथे खा. @SunilTatkare व पालकमंत्री @iAditiTatkare यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली. pic.twitter.com/jeZ9qkfzzj
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 9, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.