HW News Marathi
देश / विदेश

मोदींना टक्कर देण्यासाठी शरद पवार युपीएचे अध्यक्ष होणार?

नवी दिल्ली | देशातील राजकारण सध्या अनेक विषयांनी गुरफटलेले आहे. एकीकडे केंद्र सरकारने कृषी कायदे लागू केल्याने शेतकरी असंतुष्ट आहेत,अशा परिस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. त्यांनतर आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात एक मोठी घडामोड घडत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना युपीए अध्यक्ष करण्याची काँग्रेसनं तयारी सुरू केली आहे. दरम्यान, युपीएचे अध्यक्ष पद सध्या सोनिया गांधी यांच्याकडे आहे. आणि आता त्या आपल्या पदावरुन राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या पदावर योग्य दावेदार म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.

शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रासारखी महाविकास आघाडी राष्ट्रीय पातळीवर करावी अशी मागणी होते आहे.विशेष म्हणजे याबाबत काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रस्ताव शरद पवार यांना दिल्याची माहिती मिळाली आहे. विरोधी पक्षाला एकत्र करुन आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये संयुक्त पुरोगामी आघाडीचं (UPA) नेतृत्व शरद पवार यांनी करावं, असं काँग्रेसनं प्रस्तावात म्हटलं आहे.

शरद पवार यांना फक्त युपीए चेअरमन नाही तर पुढच्या लोकसभेचा पंतप्रधानपदाता चेहरा म्हणूनही पाहिल जातयं . तसं पाहिलं तर देशात पुढील लोकसभा निवडणुकीसाठी अजून साडेतीन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. आता लोकसभा निवडणुका २०२३ मध्ये होतील. मात्र, आतापासून काँग्रेसनं यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांना यूपीएकडून पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पुढे करण्यात आलं होतं. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध राहुल गांधी यांचा टिकाव लागला नाही. २०१४ प्रमाणे २०१९ मध्येही काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. नंतर पक्षांतर्गत वाढत्या दबाबामुळे राहुल गांधी यांना अध्यक्षपदाचाही त्याग करावा लागला होता.

सध्या कॉंग्रेस पक्षाला उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. हे थांबवून पुन्हा झेप घेण्यासाठी काँग्रेससह इतर विरोधी पक्ष देखील आपली रणनीती आखताना दिसत आहेत. आता, शरद पवार यांच्याकडे युपीएच्या प्रमुख पदाची म्हणजेच देशातील विरोधी पक्षनेत्याची सूत्रे हाती देण्यात येणार आहेत. त्यामुळेच आता महाराष्ट्रासह राष्ट्रवादी काँग्रेसला देखील पंतप्रधान पदाची चाहूल लागली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एचडी देवेगौडा पुन्हा एकदा राजकीय आखाड्यात उतरणार

News Desk

काँग्रेसमध्ये समाज-गैरसमज ! राहुल गांधींनी वरिष्ठ नेत्यांवर खरंच ‘तो’ आरोप केला ? 

News Desk

अन्नधान्य उत्पादनात दुपटीने वाढ

News Desk