HW News Marathi
देश / विदेश

अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत अखेर शरद पवारांनी सोडले मौन, म्हणाले…!

नवी दिल्ली । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. राज्यात अत्यंत वेगाने घडणाऱ्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची आज (१६ मार्च) झालेली ही पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. यावेळी, अडचणीत सापडलेल्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंबाबत प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, “मला ह्यावर काहीही बोलायचं नाही कारण या प्रकरणी आता राष्ट्रीय तपास यंत्रणा काम करते आहे. अधिकारांचा गैरवापर करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची काम राष्ट्रीय तपास यंत्रणा करत असते. त्यामुळे, आम्ही त्यांच्या कारवाईला सहकार्य करणार आहोत.”

नियुक्ती आणि निलंबनावर आमच्यात चर्चा होत नाहीत !

राज्यात अनेक मोठ्या घडामोडी सुरू असतानाच शरद पवार यांनी काल (१५ मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने मोठ्या चर्चा रंगू लागल्या होत्या. त्याबाबत “अनिल देशमुख, पोलीस आयुक्तांबाबत तुम्ही मुख्यमंत्र्यांना काय निर्देश दिले आहेत का?”असा प्रश्न शरद पवार यांना पत्रकारांनी विचारला असता पवार म्हणाले की, “मी मुख्यमंत्र्यांना कोणतेही निर्देश दिले नाहीत. आम्ही वारंवार भेटत असतो. यावेळी राज्यातील प्रमुख प्रश्नांवर चर्चा होत असते. आमच्यात होणारी चर्चा ही विकासावर, विकासकामांवर असते. नियुक्ती आणि निलंबनावर आमच्यात चर्चा होत नाही.”

अनिल देशमुख आणि परमवीरसिंह यांच्याबाबत मुख्यमंत्री बोलतील !

“गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलीस आयुक्त परमवीरसिंह यांच्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतील. मी कसं बोलणार ? हे सगळे निर्णय मुख्यमंत्री घेणार”, असे सांगतानाच शरद पवार पुढे म्हणाले की, “महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. राज्याचा गृहविभागही चांगलं काम करत आहे. म्हणूनच, पदाचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्याचे कृत्य समोर येऊन त्यांच्यावर कारवाई होण्यास मदत झाली आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

WomensDay2019 : स्वतःसाठी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या ‘या’ महिलांचा प्रेरणादायी प्रवास

News Desk

राहुल गांधी यांना पाकिस्तानला मदत करायची आहे | रविशंकर प्रसाद

swarit

इम्रान खान आज पाकिस्तानच्या २२ व्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार

News Desk