HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ३१ मार्चला शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगितलं जात होतं. दरम्यान, आज (३ एप्रिस) शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत माहिती दिली आहे. शरद पवार यांची आज डॉक्टरांच्या टीमने तपासणी केली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. पवार यांना ७ दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे आणि १५ दिवसानंतर जर त्याचे शरीर चांगले साथ देत असेल तर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

पुन्हा शस्त्रक्रिया होणार

15 दिवसानंतर पवारांची पुन्हा एकदा तपासणी केली जाईल. त्यांची प्रकृती उत्तम असेल तर त्यांच्या गॉल ब्लॅडरच्या शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात येणार आहे, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.

नेत्यांकडून विचारपूस

दरम्यान, पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर भाजप नेते नारायण राणे, शिवसेना नेते संजय राऊत, कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

शरद पवार यांची शस्त्रक्रिया का केली?

शरद पवार यांच्या पित्तनलिकेत एक खडा अडकून बसला होता. हा खडा उघड्यावर राहून देणे योग्य नव्हते. त्यामुळे तातडीने त्यांची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुर्बिणीद्वारे पित्तनलिकेतील खडा काढण्यात आला. त्यामुळे शरद पवार यांच्या यकृतावरील दाब कमी होईल. शरद पवार यांनी थोडी कावीळही झाली होती. तीदेखील कमी होईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. ही शस्त्रक्रिया जवळपास अर्धा तास सुरु होती.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने मुंबई येथील ब्रीच कॅंडी रुग्णालयात २९ मार्चला दाखल केले होते. या ठिकाणी डॅाक्टरांनी केलेल्या तपासनीनंतर महत्वाची माहिती समोर आली होती. शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे समोर आले होते. शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्यावर त्यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विभागात १.३५ लाख हेक्टरवर नुकसान, शासन शेतकर्‍यांच्या खंबीरपणे पाठिशी! – उपमुख्यमंत्री

Aprna

महापुरानंतर रोगराई वाढण्याची भीती, मेडिकल कॅम्प उभारले जाणार- अमित देशमुख

News Desk

“आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा”; भाजपचा ठाकरेंवर निशाणा

News Desk