HW News Marathi
देश / विदेश

‘शरद पवारांकडून अमित शहांना खास आमंत्रण’, पुण्यात होणार दुसरी भेट

पुणे | राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत नुकतीच भेट झाली. यानंतर आता पुन्हा या दोघांची भेट पुण्यात होणार आहे. दिल्लीत झालेल्या भेटीवेळी शरद पवार यांनी अमित शाह यांना पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचं निमंत्रण दिलं आहे. अमित शाह सप्टेंबरमध्ये एका कार्यक्रमासाठी पुण्यात येणार आहेत. पुण्याचा दौरा करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पवारांनी शाह यांना शुगर इन्स्टिट्यूटच्या भेटीसाठी खास निमंत्रण दिलं आहे.

काय आहे भेटीमागचं कारण?

दिल्लीत झालेल्या भेटीवरून राजकीय वातावरणात अनेक खलबतं सुरु झाली होती. मात्र आताच्या भेटीचा कारण आधीच स्पष्ट झालं आहे. राहुल गांधी यांनी विरोधकांची एकजूट करण्यासाठी ब्रेकफास्ट मीट आयोजित केलेली असताना दुसरीकडे शरद पवार यांनी अचानक भेट घेतल्यानं भेटीच्या कारणाबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. मात्र, साखर कारखाने आणि सहकाराशी संबंधित विषयावर शाह यांची भेट घेतल्याचं पवारांनीच स्पष्ट केलं.

या भेटीतच शरद पवार यांनी अमित शाह यांना पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचं निमंत्रण दिल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार आणि अमित शाह यांची बैठक सुरू असतानाच अमित शाहांनी पुण्यात येणार असल्याची माहिती पवारांना दिली. पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त येणार असल्याचं शाह म्हणाले. त्यावर शरद पवारांनी शाह यांना पुण्यात आलात, तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला आवर्जून भेट देण्याची विनंती करत निमंत्रण दिलं आहे.

शरद पवार यांनी शाह यांना एक पत्र दिलं

शाह यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी शाह यांना एक पत्र दिलं होतं. त्या पत्राची प्रत त्यांनी ट्वीट केली होती. “आम्ही साखर उद्योगाशी संबंधित दोन महत्त्वाच्या मुद्द्यांकडे अमित शाह यांचं लक्ष वेधलं. यामध्ये साखरेला हमीभाव आणि साखर कारखान्यांच्या परिसरातच इथेनॉल मॅनिफॅक्चरिंग युनिट बसवणे या गोष्टींचा समावेश आहे. आम्हाला आशा आहे की या समस्यांमध्ये तातडीने लक्ष घालून सहकार मंत्र त्या सोडवण्यासाठी पावलं उचलतील”, असं आपल्या ट्वीटमध्ये शरद पवार यांनी नमूद म्हटलं होतं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमेरिका युक्रेनमध्ये सैन्य पाठवणार नाही, पण…! – जो बायडेन

Aprna

“शेतकऱ्यांनी आपल्या घरी परत जावं!”, मोदींचं आंदोलन करणाऱ्यांना आवाहन

News Desk

५ एकर जमिनीची भीक नको | असदुद्दीन ओवेसी

News Desk