HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांना ‘हिंदू’ या शब्दाची अ‍ॅलर्जी! – राज ठाकरे

मुंबई। शरद पवारांना हिंदू या शब्दाची मुळात अ‍ॅलर्जी आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरेंनी आज (१ मे) महाराष्ट्र दिनानिमित्ताने औरंगाबादमध्ये सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकासआघाडीने सभेला परवानगी देण्यास उशीर केल्यामुळे त्यांनी टीका केली आहे.

राज ठाकरे म्हणाले, “शरद पवारांना हिंदू या शब्दाची मुळात अ‍ॅलर्जी आहे. महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा आहे. पण, त्याआधी आमच्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे. आणि त्यांचा विचार घेऊन ते पुढे गेले आहेत. परंतु, शरद पवारांच्या तोंडी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कधी ऐकले नाही. मी आता काढल्यानंतर ते बोलायला लागलेत,” असे टीकास्त्र त्यांनी सोडले आहे.

कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही

“मी गुढीपाडव्याच्या सभा घेतल्यानंतर अनेक जण बडबड करायला लागले. या सर्वांना उत्तर देण्यासाठी मी ठाण्यात उत्तर सभा घेतली. यानंतर मला दिलीप धोत्रेंनी मला फोन केला. संभाजीनगर हे महाराष्ट्राचे मध्य असून येथून पुढील मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात सभा होणार आहे. मी येथून पुढे विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रमध्ये मी सभा घेणार आहे. यामुळे माझ्या सभांना आडकाठी करू नका. मी कुठेही सभा घेतली तरी ती पाहिली जाणार आहे. कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही,” असे राज ठाकरे म्हणाले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभाविपचे सेल्फी विथ कॅम्पस अभियान, महिला सशक्तीकरणासाठी ‘मिशन साहसी’

News Desk

पुण्यातील फॅशन स्ट्रीटला भीषण आग, अथक परिश्रमाने आग आटोक्यात, ८०० दुकानं जळून खाक

News Desk

वांगणीत घरफोडी, २ लाखांचा ऐवज लंपास

News Desk