HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार आज राज्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर

मुंबई | महाराष्ट्रात सध्या अनेक ठिकाणी भीषण दुष्काळस्थिती आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून या भीषण समस्येकडे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, महाराष्ट्रातील लोकसभेचे चारही टप्पे पूर्ण झाल्यानंतर राजकीय पक्षांनी, नेत्यांनी राज्यातील भीषण दुष्काळस्थितीवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज (१२ मे) राज्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. ते माण तालुक्यात दुष्काळ पाहणी दौर्‍यावर असणार आहेत. या तालुक्यातील शिंदी खुर्द, वावरहिरे, मार्डी, भालवडी, पानवण, म्हसवड या ठिकाणी भेटी देऊन चारा छावणी, पाणी टंचाईची परिस्थिती जाणून घेतील.

“रविवारी सकाळी ९ ते १० यावेळेत शरद पवार हे वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतलेल्या शिंदी खुर्द येथील महाश्रमदान शिबीरास भेट देणार आहेत. त्यानंतर वावरहिरे येथे रोजगार हमी योजनेमार्फत सुरू असलेल्या कामांची पाहणी व पाणी टंचाई परिस्थितीची माहिती घेणार आहेत. मार्डी येथे वाळलेल्या डाळींब व लिंबाच्या बागांना भेट देणार आहेत. त्यानंतर भालवडी येथील चारा छावणीस भेट देऊन तेथील पाणी टंचाईच्या परिस्थितीची माहिती घेणार आहेत. पानवण येथे वॉटरकप स्पर्धेतील कामांची पाहणी करून पाणी टंचाईचा आढावा घेणार आहेत. तसेच म्हसवड येथे 3.30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात येणार्‍या पाणी टँकरचा शुभारंभ शरद पवार यांच्या हस्ते होईल”, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाश्त्यावर ताव मारुन काँग्रेसचे उपोषण

News Desk

पुणे शहरातील वाहतूक ३१ मार्चपर्यंत पुर्णपणे बंद

swarit

नांदेड शहर  काँग्रेस कमिटीच्या संतप्त कार्यकर्त्यांंनी पाकिस्तान पंतप्रधानांची प्रतिमा आणि ध्वजाचे केले दहन

News Desk