HW News Marathi
देश / विदेश

आधी अमित शहा आता कर्नाटकच्या भाजप मुख्यमंत्र्यांची शरद पवारांनी घेतली भेट !

कर्नाटक | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आणि आता ते कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली आहे. बोम्मई यांनी स्वतः फोन करून पवारांना भेटण्याची व्यक्त केली अशी माहित शरद पवरांनी दिली आहे. एकीकडे जिथे चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची भेट झाली आहे तर दुसरीकडे शरद पवार आणि बोम्माईंची भेट झाली आहे. या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

काय आहे ट्विट?

बोंमाईंशी भेट झाल्याचं शरद पवारांनी त्यांच्या ट्विट मधून कळवलं आहे. ते म्हणाले,” माझ्या बंगलोर दौऱ्यावर मला कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री बोम्मई यांचा फोन आला ज्यांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच्या पदाचा आदर मनात ठेवून, मी जाऊन त्याच्याशी सौजन्याने भेट घेण्याचा निर्णय घेतला.” या वाढत्या भेटीगाठींमुळे नवीन राजकीय समीकरणं पाहायला मिळणार का अश्या चर्चांना आता उधाण आलं आहे.

अमित शाह आणि शरद पवारांची पुन्हा होणार भेट

शाह यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी शाह यांना एक पत्र दिलं होतं. त्या पत्राची प्रत त्यांनी ट्वीट केली होती. “आम्ही साखर उद्योगाशी संबंधित दोन महत्त्वाच्या मुद्द्यांकडे अमित शाह यांचं लक्ष वेधलं. यामध्ये साखरेला हमीभाव आणि साखर कारखान्यांच्या परिसरातच इथेनॉल मॅनिफॅक्चरिंग युनिट बसवणे या गोष्टींचा समावेश आहे. आम्हाला आशा आहे की या समस्यांमध्ये तातडीने लक्ष घालून सहकार मंत्र त्या सोडवण्यासाठी पावलं उचलतील”, असं आपल्या ट्वीटमध्ये शरद पवार यांनी नमूद म्हटलं होतं.

दिल्लीत झालेल्या भेटीवरून राजकीय वातावरणात अनेक खलबतं सुरु झाली होती. मात्र आताच्या भेटीचा कारण आधीच स्पष्ट झालं आहे. राहुल गांधी यांनी विरोधकांची एकजूट करण्यासाठी ब्रेकफास्ट मीट आयोजित केलेली असताना दुसरीकडे शरद पवार यांनी अचानक भेट घेतल्यानं भेटीच्या कारणाबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. मात्र, साखर कारखाने आणि सहकाराशी संबंधित विषयावर शाह यांची भेट घेतल्याचं पवारांनीच स्पष्ट केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नल पुरोहित जेलमधून बाहेर

News Desk

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकांची घोषणा, हा तर ओबीसींवर घोर अन्याय !

News Desk

महाराष्ट्राच्या सत्तांतरावर 21 ते 23 तारखेपर्यंत घटनापीठासमोर सुनावणीची शक्यता

Aprna