HW News Marathi
महाराष्ट्र

“कोण किती जातीवादी, एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या,” धनंजय मुंडेंचे राज ठाकरेंना आव्हान

बीड | शरद पवारांनी कधीच जातपात मानली नाही. यामुळे कोण किती जातीवादी आहे, हे एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या. यााकरीता एकदा समोरासमोर बसू, असे आव्‍हान देखील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केले आहे. दोन वर्षाच्‍या कोरोना संकटानंतर सर्वत्र बेरोजगारी वाढली आहे. यामुळे भोंग्यापेक्षा बेरोजगारांचा प्रश्न महत्वाचा आहे. भोंगे लावणे अन्‌ काढण्याने आजच्या तरुणांना भाकर मिळणार आहे का? महाराष्‍ट्र प्रगतीकडे वाटचाल करेल का? भोंग्याच्या प्रश्नांने महाराष्ट्र आणखी प्रगत होणार असेल तर त्यांची भूमिका योग्य असल्‍याचे समजूया, असा खोचक टोला धनंजय मुंडे यांनी मनसेला लगावला आहे. राज्‍यात भोंग्‍याच्‍या विषयावरून राजकारण तापले आहे. मनसेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत भोंगे काढण्याचा विषय लावून धरला आहे. या विषयावर माध्‍यमांशी बोलताना मंत्री धनंजय मुंडेंनी आपली भूमिका मांडत मनसेवर निशाणा साधला आहे.

मनसेने भोंगे काढण्याचा विषय लावून धरला आहे, अशा भूमिकेतून दोन जातीत तेढ निर्माण करण्याचे काम मनसे करीत असून महाराष्‍ट्रात कायदा सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण केला जात असल्‍याचा आरोप देखील धनंजय मुंडेंनी केला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात जे घडले नाही, ते घडवायचा प्रयत्न सुरू आहे, असे ही या प्रसंगी बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले. तर शरद पवारांनी कधीच जातपात मानले नाहीत. यामुळे कोण किती जातीवादी आहे, हे एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या. यााकरीता एकदा समोरासमोर बसू, असे आव्‍हान देखील धनंजय मुंडेंनी राज ठाकरेंना केले आहे.

औरंगाबाद येथील सभेतील भाषणांवरून धनंजय मुंडेंनी राज ठाकरे यांना खुले आव्हान दिले आहे. ते म्हणाले, भोंग्यापेक्षा बेरोजगारांचा प्रश्न महत्वाचा आहे. भोंगे लावने अन् काढण्याने आजच्या तरुणांना भाकर मिळणार आहे का? दोन जातीत तेढ निर्माण करण्याचे काम मनसे करीत आहे. भोंग्याच्या प्रश्नांने महाराष्ट्र आखणी प्रगत होणार असेल तर त्यांची भूमिका योग्य आहे, असे समजू. पुरोगामी महाराष्ट्रात जे घडलं नाही ते घडवायचा प्रयत्न सुरू आहे. पवारांनी कधीच जातपात मानली नाही. कोण किती जातीवादी आहेत, एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या. एकदा समोरासमोर बसू, असे म्हणत धनंजय मुंडेंनी राज ठाकरेंना आव्हान दिले आहे. ते बीडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus : आरोग्याशी निगडीत साहित्य पुरवण्यासाठी उद्योगांनी पुढे यावे !

swarit

मराठा आरक्षणाची स्थगिती उठवण्याच्या प्रकरणावर २७ ऑक्टोबरला होणार सुनावणी

News Desk

भाजपचा पुण्यात फिरकू न देण्याचा इशारा, संजय राऊत थेट वडगाव शेरीत मेळावा घेणार!

News Desk