मुंबई | हिंदी सिनेसृष्टीतील महानायक दिलीप कुमार यांचे आज (७ जुलै) सकाळी ७.३० वाजता निधन झाले. चित्रपटसृष्टी मध्ये अनेक दिग्गज पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या निधन संपूर्ण सिनेसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. अनेकांनी ट्विटद्वारे त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सुद्धा त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली आहे.
दिलीप कुमार यांना पहिला आम्ही मित्र सायकलवरून जेजुरीला गेलो
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा देत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या जुन्या आठवणी जाग्या केल्या आहेत. जेजुरीत दिलीप कुमार यांचं शुटिंग सुरू होतं. आम्हाला त्याची कुणकुण लागली. मग आम्ही मित्रांनी सायकली काढल्या आणि सायकलवरून प्रवास करत जेजुरी गाठली. त्यावेळी मला पहिल्यांदा लांबून का होईना दिलीप कुमार यांना पाहता आलं, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सांगत होते. नंतर मी राजकारणात आलो. सरकारमध्ये विविध पदावर असताना दिलीप कुमार यांच्याशी माझा दोस्ताना झाला. ते लोकप्रिय आणि महान अभिनेते होतेच. पण माणूस म्हणूनही तितकेच ग्रेट होते, अशा शब्दात शरद पवार यांनी दिलीप कुमार यांच्याबाबतच्या आठवणी जागवल्या.
दिलीप कुमार परदेशातही लोकप्रिय होते
भारतात दिलीप कुमार यांनी आपलं एक वेगळा स्थान निर्माण केलं होतंच परंतु, परदेशातही दिलीप कुमार लोकप्रिय होते. त्याची प्रचिती आम्हाला आली. आम्ही साऊथ ईस्ट देशात गेलो होतो. दिलीप कुमारही सोबत होते. इजिप्तमध्ये आम्ही उतरलो होतो. एका कार्यक्रमानंतर आम्ही बाहेर पडलो. तेव्हा दिलीप कुमार यांना पाहण्यासाठी इजिप्तमधील लोकांनी गर्दी केली होती. इतके ते लोकप्रिय होते. त्यांची लोकप्रियता भारतापुरतीच नव्हती, तर भारताबाहेरही ते लोकप्रिय होते, असं ते म्हणाले. अलिकडे दिलीप कुमार यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांना मी भेटून आलो होतो. त्यांच्या प्रकृतीची चौकशीही केली होती, असंही त्यांनी सांगितलं.
दिलीप कुमारांची कारकीर्द
दिलीप कुमारांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले होते. त्यांना मिळवलेल्या पुरस्कारांची नोंद गिनिज बुकात झाली आहे. ८ फिल्मफेअर पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार (१९९१), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९४), एनटीआर पुरस्कार (१९९७), पाकिस्तान सरकारतर्फे निशान-ए-इम्तियाझ पुरस्कार (१९९८), जीवनगौरवर पुरस्कार फिल्मफेअर, पद्म विभूषण पुरस्कार (२०१५), सीएनएन आयबीएन जीवन गौरव पुरस्कार (२००९) अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. फिल्मफेअर पुरस्कारात १९ वेळा नामांकने मिळवणारेही ते एकमेव अभिनेते होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.