HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र मुंबई राजकारण

कृषी कायद्याबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे शरद पवारांनी केले स्वागत

मुंबई | केंद्र सरकारने लागू केलेल्या ३ कृषी कायद्याविरोधात शेतकरी गेले अनेक दिवस-महिने जे आंदोलन करत आहेत त्याची दखल अखेर सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. कृषी कायद्याला अंतरिम स्थगिती सुप्रीम कोर्टाने दिली आहे. केंद्र सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

शरद पवार यांनी ट्विट करत असं म्हटलं आहे की, सुप्रीम कोर्टाचा कृषी कायद्याबाबतचा निर्णय स्वागतार्ह आहे. आता तरी शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये बातचीत होऊन तोडगा निघेल, असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे. दरम्यान, शरद पवार यांनी कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्यासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतली होती.

केंद्र सरकारचा अत्याचार सहन करत शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर न्याय मागतोय. परंतु त्यांच्याके सरकारने लक्ष दिलं नाही किंबहुना त्यांचं म्हणणं समजून घेऊन त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. असंवेदनशील सरकारकडून अनेकदा चर्चा होऊनही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निर्णय झाला नाही. कोर्टाच्या निर्णयानंतर आतातरी सरकारने शेतकऱ्यांची बाजू समजावून घेऊन त्यांना न्याय द्यावा, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Related posts

शहीद भगतसिंगांचं ते पिस्तुल 90 वर्षांनंतर जगासमोर

News Desk

सत्तेसाठी शिवसेनेने सगळी तत्वे गुंडाळून मातोश्रीच्या एका कोपऱ्यात ठेवली !

News Desk

नागपुमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात कैलाश सत्यार्थी प्रमुख पाहुणे

News Desk