HW News Marathi
महाराष्ट्र

आजच्याच दिवशी शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीला झाली होती सुरुवात…

मुंबई | गेली ५४ वर्ष शरद पवारसाहेब संसदीय राजकारणात असून २२ फेब्रुवारी १९६७ रोजी त्यांनी पहिल्यांदा आमदारकीची शपथ घेतली होती. त्यानंतर ५४ वर्ष सलग ते कोणत्या ना कोणत्या सभागृहाचे सदस्य राहिलेले आहेत. महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री, देशाचे सरंक्षणमंत्री, कृषीमंत्री अशी पदेही त्यांनी भूषवली आहेत याचीच आठवण राष्ट्रवादीकडून आज करून देण्यात आली आहे.देशातील सर्वात वरिष्ठ आणि ज्येष्ठ असलेले राजकारणी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे पाहीले जाते. ८० व्या वर्षात देखील राष्ट्रीय राजकारणात सक्रीय असलेले शरद पवार हे एकमेव राजकारणी आहेत.

शरद पवार यांनी पहिल्यांदा आमदारकीची शपथ घेतली तेव्हा त्यांचे वय अवघे २७ वर्ष एवढे होते. बारामतीसारख्या दुष्काळी भागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना दिली होती. विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहात त्यांनी काम केले. देशातील सर्वात कमी वयाचा मुख्यमंत्री होण्याचा मानही शरद पवार यांच्याकडेच आहे.

मागच्या ५४ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक संघर्षाचे प्रसंग आले. पवारांची राजकीय कारकिर्द संपली अशाप्रकारच्या अफवा देखील अनेकदा उठल्या. विरोधकांकडून तसे प्रयत्नही झाले. मात्र जनतेशी जोडलेली घट्ट नाळ शरद पवारांना राजकारणातून बाद करु शकली नाही. याची झलक ८० व्या वर्षात देखील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दिसली. भाजपचा चौफेर वारू उधळलेला असतानाही १०५ आमदारांच्या पक्षाला विरोधात बसविण्याची किमया शरद पवार यांनी करुन दाखवली आहे असेही राष्ट्रवादीच्या अधिकृत पेजवर मांडण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘शिवराज्याभिषेक सोहळा’ असा महाराष्ट्राचा चित्ररथ

News Desk

मुस्लिमांना खूश करण्यासाठी राम मंदिराबद्दल वक्तव्य केलं का? दरेकरांचा पवारांना सवाल

News Desk

“भाजपाचं म्हणजे, मी नाही त्यातली आणि…” सामना अग्रलेखातून टोला

News Desk