HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

शरद पवारांची १२ वाजता पत्रकार परिषद,कृषी विधेयकाबाबत भूमिका मांडणार ?

मुंबई | देशामध्ये भाजप सरकारने कृषी विधेयकांची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही सभागृहांमध्ये ही विधेयके शेतकऱ्यांच्या हिताची असल्याचा दावा केला.दुसरीकडे काँग्रेसने या विधेयकांना कडाडून विरोध केला.मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली नाही,त्यामुळे सध्या राज्यात भाजपविरोधी आणि केंद्रात भाजपसोबत अशी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या भूमिका आहे का या चर्चांना उधाण आले आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत गंभीर बनत चालला आहे.संसदेतसुद्धा महाराष्ट्रातील खासदारांनी आरक्षणासाठी आवाज उठवला.महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये नुकताच अर्ज दाखल केला आहे.मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजप सध्या शरद पवारांना सतत टार्गेट करताना दिसत आहे.

या सगळ्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आज दुपारी १२ वाजता मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.त्यामुळे या पत्रकार परिषदेत कृषी विधेयकांबद्दल,मराठा आरक्षणाबद्दल  राष्ट्रवादी काँग्रेसच आणि सरकारची भूमिका त्याचपद्धतीने राज्यातील कोरोना परिस्थिती या सगळ्या गोष्टीवर शरद पवार भाष्य करतात का हे पाहणं महत्वाचं आहे.

Related posts

MPSC परीक्षा रद्द करुन सरकारने एकाच जातीचा विचार केला, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

News Desk

#Vidhansabha2019 | भाजपकडून ‘या’ आयारामांना उमेदवारी जाहीर

News Desk

‘ते’ माझे वैयक्तिक मत, उद्धव ठाकरेंना सल्ला देण्याचा मला अधिकार नाही !

News Desk