HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार साहेब आधारवड ! भाजपच्या नेत्याच्या ट्विटची चर्चा !

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचिया पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं,आता त्यांच्यावर ३१ मार्चला शस्त्रक्रिया होणार आहे.शरद पवार यांच्या प्रकृतीसाठी अगदी विरोधी पक्षातील नेत्यांनीही सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.राज ठाकरे,देवेंद्र फडणवीस ,प्रविण दरेकर,लता मंगेशकर यांना पवारांची विचारपूस केली. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या ट्विट ची मात्र सध्या चर्चा होत आहे. पवार साहेब लवकर बरे व्हा, ‘राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील ‘आधारवड’ आहात तुम्ही’ असं म्हणत त्यांनी सदिच्छा दिल्या आहे.

भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे आमदार अतुळ भातखळकर आणि प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करून शरद पवार यांना आजारातून लवकरचे बरे व्हावे, अशा सदिच्छा दिल्या आहे.

प्रवीण दरेकर यांनी अत्यंत मोजक्या शब्दात ट्वीट केले आहे. ते म्हणाले की, पवार साहेब लवकर बरे व्हा! नियोजित शस्त्रक्रिया यशस्वी होऊन आपण लवकर बरे व्हावे, हीच ईश्वराकडे प्रार्थना. पक्षभेदापलीकडचे प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यांचे ‘मार्गदर्शक’ आहात तुम्ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील ‘आधारवड’ आहात तुम्ही’ असं सूचक विधान केले आहे. आधारवड आणि मार्गदर्शक शब्दांवर जोर दिल्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आमदार निलेश लंकेंनी अरेरावी, शिवीगाळ, मारहाण केली नाही’

News Desk

खुप लोकांना वाटलं पंकजा ताई गेल्या, संपल्या!

News Desk

लोकांना विकासकामं पाहिजेत फक्त शब्द नको, विजयानंतर रोहीत पवारांचा राम शिंदेंना टोला

News Desk