HW News Marathi
देश / विदेश

शरद भाऊ ! पवारांनी दिला सुषमा स्वराज यांच्या आठवणींना उजाळा

मुंबई। देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. त्या६७ वर्षांच्या होत्या. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुषमा यांच्या नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्त्वाच्या जोरावर अनेक लढाया यशस्वीपणे लढलेली रणरागिणी आज मृत्यूवर विजय मिळवू शकली नाही, हे दुर्दैवच. सुषमा स्वराज यांचे निधन हे देशवासीयांना चटका लावून जाणारे आहे. अर्थात, राजकीय कारकिर्दीत त्यांनी केलेली कामगिरी, अनेक विक्रम त्यांची कायमच आठवण करून देणारे आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीही ट्वीटरद्वारे सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “सुषमा स्वराज या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती हरपल्याची त्यांनी भावना व्यक्त केली आहे. ते म्हणाले, सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या मला ‘शरद भाऊ’असे संबोधायच्या. संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली”, असे ट्विट करत शरद पवार यांनी सुषमा स्वराज यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी दिली देशव्यापी ‘बंद’ची हाक

News Desk

अयोध्या प्रकरणाच्या अंतिम निर्णयावर जमियत उलेमा ए हिंदकडून पुनर्विचार याचिका

News Desk

टेलिप्रॉम्टर बंद पडले; पंतप्रधान मोदी गडबडले

Aprna