मुंबई | पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर शरद पवार रुग्णालयात तपासणीसाठी गेले असता त्यांच्या तोंडात एक अल्सर आढळला असून तो काढण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
दरम्यान त्यांची तब्येत चांगली असून ते आता रुग्णालयात विश्रांती घेत आहेत. शिवाय देशभर पसरलेल्या कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत.ते लवकरच आपले कामकाज पुन्हा सुरू करतील असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.
Post Gall Bladder surgery of our president Sharad Pawar saheb, a follow up visit & check up at hospital revealed an ulcer in his mouth which has been removed.
He is well & resting in hospital.
Saheb is taking stock of the pandemic situation daily & will resume his activities soon— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 25, 2021
या आधी शरद पवारांवर ३ शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना २१ एप्रिलला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शरद पवारांना पित्ताशयाचा त्रास झाल्याने त्यांना मार्च महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यासह एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान, २१ एप्रिलला पुन्हा एकदा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शरद पवारांवर पुन्हा एकदा पवारांवर छोटी शस्त्रक्रिया झाली होती. जवळपास २१ दिवसांत शरद पवारांवरील ही तिसरी शस्त्रक्रिया होती.
या आधी शरद पवारांवर १२ एप्रिलला पित्ताशयावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया पार पडली होती. त्याआधी शरद पवारांना ३० मार्चला ब्रीच कॅण्डी रुग्णालयातच दाखल करण्यात आलं होतं. २० मार्चला पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर १ शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ७ दिवस विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतर १२ एप्रिलला पुन्हा एकदा त्यांच्या गॉल ब्लॅडरवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील डॉ. बलसरा यांनी ही शस्त्रक्रिया केली होती. यापूर्वीची शस्त्रक्रिया ही डॉ. अमित मायदेव यांनी केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.