मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (७ एप्रिल) कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यांनी हा डोस त्यांच्या घरीच घेतला असून यावेळी त्यांच्यासोबत डॉ. तात्याराव लहानेही उपस्थित होते. या आधाी १ मार्चला शरद पवारांनी जे.जे. रुग्णालयात कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. दरम्यान, नुकतीच शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांनी घरातच हा डोस घेतला आहे.
आज सकाळी कोविड-१९ लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. डॉ. लहाने व त्यांच्या वैद्यकीय पथकाचे तसेच दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रीमती श्रद्धा मोरे यांचे मनापासून आभार! pic.twitter.com/pxnvZEZskB
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 7, 2021
पुन्हा शस्त्रक्रिया होणार
१५ दिवसानंतर पवारांची पुन्हा एकदा तपासणी केली जाईल. त्यांची प्रकृती उत्तम असेल तर त्यांच्या गॉल ब्लॅडरच्या शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात येणार आहे, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.
नेत्यांकडून विचारपूस
दरम्यान, पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर भाजप नेते नारायण राणे, शिवसेना नेते संजय राऊत, कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
शरद पवार यांची शस्त्रक्रिया का केली?
शरद पवार यांच्या पित्तनलिकेत एक खडा अडकून बसला होता. हा खडा उघड्यावर राहून देणे योग्य नव्हते. त्यामुळे तातडीने त्यांची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुर्बिणीद्वारे पित्तनलिकेतील खडा काढण्यात आला. त्यामुळे शरद पवार यांच्या यकृतावरील दाब कमी होईल. शरद पवार यांनी थोडी कावीळही झाली होती. तीदेखील कमी होईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. ही शस्त्रक्रिया जवळपास अर्धा तास सुरु होती.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने मुंबई येथील ब्रीच कॅंडी रुग्णालयात २९ मार्चला दाखल केले होते. या ठिकाणी डॅाक्टरांनी केलेल्या तपासनीनंतर महत्वाची माहिती समोर आली होती. शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे समोर आले होते. शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्यावर त्यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
I took my first dose of the #COVID19Vaccine in Sir J. J. Hospital, Mumbai today. To strengthen the Vaccination Drive, I appeal to all those who are eligible to take vaccine and join the fight against corona virus. pic.twitter.com/Tdl9fMxhXs
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 1, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.