HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र मुंबई राजकारण

‘शरद पवार आणि अमित शहांच्या भेटी मागचं कारण उघड’, पवार म्हणाले….

नवी दिल्ली | राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज(३ ऑगस्ट) दिल्लीत भेट झाली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तनावरणात खळबळ माजली होती, अनेक तर्क वितर्क काढले जात होते. मात्र आत आत्याच्या भेटीचं कारण स्पष्ट झालं आहे. शरद पवारांनी त्यांच्या भेटीचा फोटो ट्विट करत भेटीचं कारण स्पष्ट केलं आहे.

देशातील साखरेच्या सद्यस्थितीबाबत चर्चा

शरद पवार आणि अमित शहांच्या भेटीने अनेक चर्चांना वाट मोकळी केली होती. शरद पवारांनी त्यांच्या ट्विटर पोस्ट द्वारे भेटीचं कारण स्पष्ट केलं आहे. पहिल्या ट्विट मध्ये त्यांनी अमित शाहंचं अभिनंदन केलं आहे. ‘सर्वप्रथम, मी श्री अमित शहा यांचे भारताचे पहिले सहकार मंत्री म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले. बैठकीदरम्यान, आम्ही देशातील सद्य साखरेची परिस्थिती आणि जास्त साखर उत्पादनामुळे उद्भवणाऱ्या समस्या यावर चर्चा केली’.

तर दुसऱ्या ट्विट मध्ये त्यांनी चर्चेचं कारण स्पष्ट केलं आहे. ‘केंद्रीय सहकार मंत्री श्री अमित शहा यांच्यासमवेत आज नवी दिल्लीत एक संक्षिप्त बैठक घेतली आणि एनएफसीएसएफ (नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड) चे अध्यक्ष श्री जयप्रकाश दांडेगावकर आणि प्रकाश नाईकनवरे यांनी साखर सहकारी क्षेत्रासमोरील समस्यांवर चर्चा केली’.

पवारांसोबत हे नेते असतील उपस्थित

शरद पवार आणि अमित शाह यांच्या सोबत साखर संघटनेचे नाईकनवरे, दांडेगावकरही उपस्थित होते . एकीकडे जिथे संसदेत विरोधक एकमेकां विरोधात घोषणा बाजी करत आहेत, तिथे दुसरीकडी पवार आणि शाह यांच्या भेटीवरून नवीन राजनैतिक वळण येण्याचे संकेत आहेत. भाजप विरोधात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी आक्रमक होत असताना आता पवार आणि शहांच्या भेटीचं कारण स्पष्ट झालं आहे.

Related posts

अन्यथा आंदोलन तीव्र करु…मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून सरकारला इशारा!

News Desk

मुंबईत कोरोना संसर्ग वाढत असला तरी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय नाही – सुरेश काकाणी

News Desk

शिवसेना-भाजपकडे प्रत्येकी अडीच वर्षे राहणार मुख्यमंत्रीपद ?

News Desk