HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेणार, सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार ?

मुंबई | राज्यात बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रविवारी (१७ नोव्हेंबर) काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेटी घेणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. राज्यात सत्ता स्थापनेचा अंतिम निर्णय येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीची काल (१३ नोव्हेंबर) बैठक झाली असून या बैठकीत समान वाटपचा मसुदा ठरला आहे. या मसुद्यावर शिसवेनेसोबत चर्चा करून काही गोष्टीचा समावेश करण्यात येणार आहे. या भेटीमध्ये सत्तेतील पदांच्या वाटपांचे सूत्र ठरविण्यात येणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली जात आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरच शिवसेना वेगळी झाली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान राखणं आणि त्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ४९ वर, लोकल बंद करणे ‘हा’ शेवटचा पर्याय !

swarit

ओबीसींची जनगणना करा ! गोपीनाथ मुंडेंचा ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत पंकजा मुंडेंची मागणी

News Desk

राज्यात १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार- राजेश टोपे

News Desk