HW News Marathi
महाराष्ट्र

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर शरद पवारांचा पहिल्यांदा उत्तर महाराष्ट्र दौरा

जळगाव | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार २० आणि २१ नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करुन राष्ट्रवादीत प्रेश केल्यानंतर शरद पवार प्रथमच उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व असल्याचं समजलं जात आहे. शरद पवार उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार इथ शेतकरी मेळावा आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने जाणार आहेत.

भाजपमध्ये अन्याय झाल्याचं सांगत एकनाथ खडसे यांनी जवळपास महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. खडसे यांच्या प्रवेशानंतर भाजपचा बाले किल्ला असलेल्या उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे. त्यातच आता शरद पवार २० आणि २१ तारखेला धुळे आणि नंदुरबार येथे शेतकरी मेळावा आणि विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.

त्यांच्या या दौऱ्याकडे राजकीय वर्तृळाचे लक्ष लागले आहे. कारण केवळ जळगाव जिल्हाच नव्हे तर धुळे आणि नंदुरबारमध्येही खडसेंचे समर्थक मोठ्या प्रमाणावर आहेत. शरद पवार यांच्या या दौऱ्यानिमित्त भाजपमधील अनेक खडसे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या दौऱ्यात कोण कोण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार याकडे लक्ष लागलं आहे. शरद पवार यांचा हा दौरा हा उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला बळकटी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने या दौऱ्यात काय घडणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कौशल्य विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यास होईल मदत! – दीपक केसरकर

Aprna

भाजप सरकारला चले जाव सांगण्याची हीच योग्य वेळः खा. अशोक चव्हाण

News Desk

बंद…बंद…बंद…महाराष्ट्र बंद – 5 जूनला शेतकऱ्यांची महाराष्ट्र बंदची हाक

News Desk