HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर थोड्याच वेळात शरद पवारांची पत्रकार परिषद

मुंबई | महाराष्ट्र सहकारी बँकेच्या घोटळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर ईडीविरोधात राज्यभर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यावेळी देखील राष्ट्रवादीचे नेते अजित पवार कुठेच दिसून आले नाहीत. यावरूनही राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होता. मात्र, अजित पवार यांनी त्यांच्या आज (२७ सप्टेंबर) आमदारकीचा राजीनामा दिली. पवारांनी राजीनामा दिल्यानंतर ते सध्या नॉट रिचेबल येत आहे.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. बागडे कार्यालयात नसल्याने त्यांच्या पीएच्या हाती राजीनामा सोपवला. बागडेंना फोन करून याची माहीती दिली. यानंतर बागडेंनी सायंकाळी ५.४० मिनिटांनी हा राजीनामा मंजूर केला. अजित पवारांच्या राजीनाम्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

या पार्श्वभूमीवर शरद पवार सायंकाळी ८.३० वाजता त्यांच्या पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत पवार नेमके काय बोलणार याकडेचे लक्ष लागेल आहे. अजित पवारांच्या राजीनाम्याबद्दल शरद पवारांना देखील आंधारात ठेवण्यात आले होते. तसेच अजित पवार यांचा चिरंजीव पार्थ पवार यांना देखील त्यांच्या राजीनाम्याबद्दल माहिती नव्हते.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर

News Desk

भीमा-कोरेगाव येथील विजय स्तंभाच्या जागेचा ताबा राज्य सरकारकडे

News Desk

सरकारचे ‘ब्रेकिंग’ निर्णय आणि उद्योगाचे ‘अव्वल’ धोरण!

News Desk