HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार पुन्हा रुग्णालयात, महिनाभरात ३ शस्त्रक्रिया

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शरद पवारांना पित्ताशयाचा त्रास झाल्याने त्यांना मार्च महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यासह एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान, काल पुन्हा एकदा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी शरद पवार यांना कालच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पुन्हा एकदा पवारांवर छोटी शस्त्रक्रिया झाली. जवळपास २१ दिवसांत शरद पवारांवरील ही तिसरी शस्त्रक्रिया आहे.

या आधी शरद पवारांवर १२ एप्रिलला पित्ताशयावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया पार पडली होती. त्याआधी शरद पवारांना ३० मार्चला ब्रीच कॅण्डी रुग्णालयातच दाखल करण्यात आलं होतं. २० मार्चला पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर १ शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ७ दिवस विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतर १२ एप्रिलला पुन्हा एकदा त्यांच्या गॉल ब्लॅडरवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील डॉ. बलसरा यांनी ही शस्त्रक्रिया केली होती. यापूर्वीची शस्त्रक्रिया ही डॉ. अमित मायदेव यांनी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“या प्रकरणात केवळ परमबीर सिंग यांची चौकशी होणार की गृहमंत्र्यांचीही होणार?”, फडणवीसांचा पवारांना सवाल

News Desk

मुंबईत फेरीवाला धोरण लागू करा, BMC विरोधात आंदोलन करण्याचा भाजपचा इशारा

Aprna

भारत भालके यांच्या जागी पार्थ पवार यांची नेमणूक होणार?

News Desk