HW News Marathi
महाराष्ट्र

बिहार विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार आणि संजय राऊतांची यासाठी भेट

मुंबई | बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना लढण्यासाठी सज्ज झाली आहे. अशात बिहारमध्ये भाजपला सत्तेपासुन दूर ठेण्यासाठी त्या राज्यात महाराष्ट्राचा फॉर्म्युुला वापरण्याबाबत काल (१० ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची पवार यांच्या सिल्व्हवर ओक निवासस्थानी भेट झाली असल्याची माहिती स्वतः खासदार राऊत यांनी एक ट्विट करून दिली आहे.

देशाचे नेते शरद पवार यांना भेटलो. महाराष्ट्र आणि देशातील अनेक राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली. पवार यांच्याशी होणारा संवाद नेहमीच मार्गदर्शक असतो असे राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.प्रत्यक्षात दोन्ही नेत्यांच्या भेटीत विशेषत: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बरीच चर्चा झाली. भाजपने बिहार विधानसभेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे.

 

 

या राज्यात पुन्हा आपलीच सत्ता येईल, असा दावा भाजप नेते ठोकू लागले आहेत. त्यामुळे भाजपाला रोखण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी प्रमाणे बिहारमध्ये काँग्रेसला सोबत घेऊन आघाडी होऊ शकेल का, यावर या दोन नेत्यांनी चर्चा केल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये राष्ट्रवादीच महत्त्वाची भूमिका बजावू शकते, या हेतूने शिवसेनेने आपला दूत पाठवल्याचे समजते.

या भेटीमध्ये राज्यातील विविध महामंडळावरील अध्यक्षांच्या नियुक्त्या व राज्यपालांकडूनही 12 नामनियुक्त सदस्यांची वर्णी रखड़ली आहे. हे दोन्ही विषय लवकरात लवकर सुटावेत यासाठी महाविकासआघाडीकडून प्रयत्न करण्याच्या सूचना पवार यांनी दिल्याचे समजत आहे..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवाळीत लोडशेडींगला सुट्टी 

News Desk

आमच्यासाठी अजित पवार हेच मुख्यमंत्री !

News Desk

हजारो कोटींचा घोटाळाकरून पळालेल्या नीरवमोदीला पकडण्यासाठी पंतप्रधानांकडे कोणतीही योजना नाही

News Desk