HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल देशमुखांची साथ न दिल्याने शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाराज?

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा बचाव करण्यात असमर्थ ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रचंड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनिल देशमुख यांची बाजू व्यवस्थितपणे, ठामपणे आणि सक्षमपणे मांडली नाही. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा डागाळली. त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाराज झाले आहेत.

या संपूर्ण प्रकरणात शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांची बाजू मांडली होती. परमबीर सिंग यांनी आयुक्तपद गेल्यानंतर हे आरोप केले आहेत. ते दिल्लीत जाऊन आल्यानंतर त्यांनी पत्र लिहले. या एकूण गोष्टी संशयास्पद असल्यामुळे अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यायची गरज नाही. त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असे शरद पवार यांनी ठणकावून सांगितले होते. मात्र, शरद पवार वगळता राष्ट्रवादीचा एकही नेेता अनिल देशमुखांच्या पाठीशी उभे राहिलेले पाहायला मिळाले नव्हते. त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या या कामगिरीवर नाराज असल्याचे म्हटले जात आहे.

तर दुसरीकडे शरद पवार हे अद्याप अनिल देशमुख यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचे दिसत आहे. अनिल देशमुख यांनी न घाबरता सीबीआयच्या चौकशीला सामोरे जावे, असा सल्ला शरद पवार यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्या तुलनेने राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री कमी पडले, अशी भावना शरद पवारांच्या मनात असल्याचे म्हटले जात आहे.

आताही जेव्हा सचिन वाझे यांनी कोर्टात अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्यावर खंडणीची आरोप केले तेव्हाही अनिल परब यांनी स्पष्टीकरण दिले. मात्र, अनिल देशमुखांच्या बाजूने कोणीही बोलले नाही. स्वतः अनिल देशमुखही नाही कारण तोवर अनिल देशमुखांचा राजीनामाही झालाच होता.

त्यानंतर, महाविकासआघाडी सरकार आणि अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशीच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांनी केलेले आरोप गंभीर असून त्यासाठी स्वतंत्र चौकशी होणे गरजेचे असल्याचे सांगत उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला होता. त्यामुळे आता अनिल देशमुख यांना सीबीआयच्या चौकशीला सामोरे जाण्याशिवाय गत्यंतर उरलेले नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, आतापर्यंत सीबीआयने परमबीर सिंग, समाज सुधारक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांची चौकशी केली आहे. संजय पाटील यांनीच परमबीर सिंह यांना अनिल देशमुखांनी १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याची माहिती दिली होती. त्यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत देखील वाढ झाली आहे. मात्र आता यापुढेही शरद पवार अनिल देशमुखांना खंभीर साथ देतात का ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जमावबंदीतही आंदोलन, सोयाबीन-कापसाच्या उत्पादकांसाठी स्वाभीमानीचा अन्नत्याग!

News Desk

फडणवीसांना पंकजा मुंडे म्हणतात, आनंद आहे!

News Desk

देवेंद्र फडणवीस शनिवारी साहित्य संमेलनास उपस्थित राहणार

News Desk