HW News Marathi
महाराष्ट्र

लोकांना वाटतं की मी कोरोनाची लस घेतली आहे – शरद पवार

पुणे | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी उत्तरप्रदेश येथे झालेल्या बलात्कारावर तसेच, केंद्र सरकारच्या धोरणांवरही भाष्य केले. दरम्यान, यावेळी शरद पवारांनी कोरोनाची लस घेतली आहे का असं काही जण म्हणत आहेत. शरद पवारांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. मी कोरोनाची लस घेतली नाही तर बीसीजी म्हणजे प्रतिकारक शक्ती वाढवणारी लस घेतली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

“मी व माझ्या स्टाफने प्रतिकारक शक्ती वाढवणारी लस घेतली आहे. कोविडवरची लस येण्यासाठी जानेवारी अखेरपर्यंत वेळ लागेल असे सिरमकडून सांगण्यात आल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. लोकांना वाटते की मी लस घेतली आहे. अशी चर्चा लोकांमध्ये असते की सिरमचे प्रमुख पवारांचे वर्ग मित्र आहे. त्यामुळे त्यांनी ती लस घेतली असेल असं लोक बोलतात. त्यांनी असे म्हटल्यानंतर एकच हशा पिकला. पण मी आणि माझ्या स्टाफने घेतली लस ही कोरोनावरची नाही तर प्रतिकारशक्ती वाढवणारी आहे असे शरद पवार यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Belgaum Election | भाजपच्या मंगला अंगडी विजयी, काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांचा २९०३ मतांनी पराभव

News Desk

आदित्य ठाकरेंना कधी भेटले नाही आणि बोलणेही झाले नाही, रियाचा मोठा खुलासा

News Desk

“…म्हणजे मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का?” फडणवीसांचा सवाल

News Desk